Unmesh-Joshi
Unmesh-Joshi 
मुंबई

उन्मेष जोशी यांची आजही होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - दादर येथील कोहिनूर मिलच्या जागेच्या खरेदीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. ईडीने जोशी यांचे व्यावसायिक भागीदार राजन शिरोडकर यांनाही काही कागदपत्रे घेऊन बोलावले होते. या दोघांनाही बुधवारी (ता. 21) पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर सोमवारी (ता. 19) उन्मेष जोशी यांची ईडी कार्यालयात आठ तास चौकशी करण्यात आली. मंगळवारीही जोशी यांच्यासह राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, बांधकाम व्यावसायिक व भागीदार राजन शिरोडकर यांना "ईडी' कार्यालयात बोलावण्यात आले होते.

शिरोडकर यांच्याकडे संबंधित कंपनीतील भागीदारीबाबतच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली. ही कागदपत्रे त्यांनी "ईडी' अधिकाऱ्यांना दिली. जोशी व शिरोडकर यांची आज एकत्र चौकशी करण्यात आली. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. बुधवारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

इन्फ्रास्ट्रक्‍चर लीजिंग ऍण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएलएफएस) या सरकारी क्षेत्रातील कंपनीने कोहिनूर सीटीएनएल कंपनीला दिलेले 860 कोटींचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात "ईडी'ने ऑगस्टच्या सुरवातीला तपास सुरू केला आहे. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांच्या मालकीच्या या कंपनीद्वारे दादरमध्ये कोहिनूर मिलच्या जागेवर कोहिनूर स्क्वेअर बहुमजली इमारतींचा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

या मुद्द्यांवर हवी माहिती
आयएलएफएस प्रकरणात 28 ते 29 जणांना देण्यात आलेल्या कर्जाबाबत ईडीला संशय असून, त्यांची पडताळणी सुरू आहे. कर्जाची रक्कम कोठे खर्च करण्यात आली? ज्या कारणासाठी कर्ज घेण्यात आले होते, त्याच कामासाठी त्याचा वापर झाला का? कंपनीच्या भागभांडवलावर कोणाची मालकी आहे? "कोहिनूर टॉवर'च्या बांधकामावर किती रक्कम खर्च झाली? या मुद्द्यांबाबत ईडी माहिती घेत असून, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही प्रश्‍न विचारले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT