मुंबई

नकोसा झालेला शोभिवंत सकर फिश संपवतोय खाडीतली मासोळी! या घातक माशामुळे स्थानिक जलसंपत्ती नामशेष होण्याची भीती

प्रसाद जोशी

वसई ः अनेक जण आपल्या घरी शोभिवंत मासे पाळतात. फिशटँकमधले हे मासे दिसतात सुंदर. त्यांचा कोणताही उपद्रव नसतो. मात्र, आर्मर सकर नावाने अोळखला जाणारा मासा आपल्याच बेजबादारपणामुळे उपद्रवी ठरू लागला आहे.  प्रतिकूल वातावरणातही तग धरू शकणाऱ्या सकर माशाची वाढही वेगाने होते. फिशटँकमध्ये तो मावेनासा झाला की त्याला खाडी, तलाव वा नदीत सोडून देण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे इतर मासे नामशेष होण्याची भीती प्राणिशास्त्र अभ्यासक प्रा. भूषण भोईर यांनी व्यक्त केली आहे.

पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथील एका खाडीत सकर फिश सोडून दिल्याचे आढळले आहे. तो लहान स्थानिक मासे किंवा त्यांची अंडी खाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात तलाव, नदी किंवा खाडीतील मासे नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रा. भोईर म्हणाले.
प्राणिशास्त्र प्रा. भोईर यांच्या म्हणण्यानुसार, सकर मासे हवेतही श्वास घेऊ शकत असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या जलस्रोतात सहज जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण वाढू शकते. त्यातच अंगाभोवती कवच असल्याने अन्य माशांपासून ते सुरक्षित असतात. एकीकडे स्थानिक मच्छीमार मासेमारीवरच अवलंबून असतात, परंतु शोभिवंत माशांची हौस पूर्ण झाली कि त्यांना खाडीत सोडणे त्यांच्यासाठीही घातक ठरू शकते. सकर फिशचे प्रमाण असेच वाढत गेले तर कालांतराने स्थानिक माशांचा प्रजाती दिसेनाशा होतील. स्थानिक मच्छीमारीलाही धोका आहे.

फिशटँकमध्ये हौसेखातर बाळगले जाणारे सकर फिश नंतर जलस्रोतात सोडले जातात. सकर फिश स्थानिक माशांची प्रजाती नष्ट करू शकतो. त्यांची वाढ लवकर होत असल्याने अन्य माशांसाठी तो घातक ठरू शकतो. शोभिवंत मासे विक्रेते व नागरिकांवर सरकारने निर्बंध घातले पाहिजेत. असे मासे सोडण्याआधी नियम ठरवणे गरजेचे आहे. 
- प्रा. भूषण भोईर, प्राणिशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर

 

असा आहे सकर फिश...
सकर फिश भारतीय नाही. शोभिवंत माशांच्या व्यापारातून तो भारतात आला. टॅंकमधील शेवाळ खाऊन तो जगतो. वर्षभरात तो 10 सेंटीमीटर इतका वाढतो. टँकमध्ये मावेनासा झाला की एक तर तो पुन्हा विक्रेत्याकडे दिला जातो किंवा खाडीत वा तलावात सोडला जातो. निमखारट वा चिखल असलेल्या पाण्यातही तो तग धरू शकतो. पाण्यात प्राणवायू मिळेनासा झाला की तो हवेतूनही श्वास घेऊ शकतो. अंडी देण्याची त्याची क्षमताही अधिक असते. खाडी-तलावातील माशांची अंडी तो खातो. त्यामुळे स्थानिक माशांचे प्रमाण कमी होण्याचा धोका आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT