मुंबई

राष्ट्रवादीत ‘नाराजी’नामा..! 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्‍तव्यानंतर उडालेली खळबळ आता राजीनामे देण्यापर्यंत गेली आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य व खासदार तारिक अन्वर यांनी तडकाफडकी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही राजीनामा देत पवार यांच्या विधानाचा निषेध केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राफेल गैरव्यवहारात पाठराखण केल्याच्या भावनेतून या नेत्यांनी राजीनामे दिले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज राफेल खरेदी व्यवहाराबाबत आक्रमक होत केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे कागदाचे राफेल विमान उडवत सरकारचा निषेध केला. पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाची भूमिका मांडत पवारांच्या विधानाचा विपर्यास झाल्याचे स्पष्ट केले. पक्षाचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना प्रत्युत्तर देत पवार यांनी मागणी केलेल्या संयुक्‍त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी मान्य करण्याचे आवाहन केले. 

राफेलवरून आज राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक आक्रमक होत बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला असला, तरी पवार यांच्या वक्‍तव्याबाबत मात्र नाराजीचा सूर कायम असल्याचे चित्र आहे.

अनाकलनीय निर्णय - पटेल
तारिक अन्वर यांचा राजीनामा देण्याचा निर्णय अनाकलनीय असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. गैरसमजातून त्यांनी राजीनामा दिल्याचा दावा करीत पक्षाने तारिक अन्वर यांना कायम नेतेपदी स्थान दिल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT