Vikram Gokhale
Vikram Gokhale esakal
मुंबई

विक्रम गोखले घेणार “CLASS”

सकाळ डिजिटल टीम

"तुमचा आवाज किती चांगला आहे!" "तुम्ही कथा फारच सुंदर वाचता!" ह्या आणि अश्या अनेक प्रतिक्रिया तुम्हाला अनेक जणांकडून मिळत असतील.. तोच "आवाज" तुमची ओळखही बनू शकतो आणि तुमचं करिअरसुद्धा! ही कला फक्त तुमच्या आवडी पुरती मर्यादित न ठेवता, योग्य प्रशिक्षण घेऊन तुमच्या आवाजाच्या माध्यमातून अर्थार्जनाचा एक उत्तम पर्याय तुम्हाला उपलब्ध झाला तर?

मात्र त्यासाठी आवाजावर योग्य संस्कार करणं आणि शास्त्रशुद्ध ज्ञान घेणंही तितकच महत्वाचं आहे.

सकाळ आणि ए. के. स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने “व्हॉइस ओव्हर आणि कार्टून, फिल्म डबिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर मोफत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तुम्हाला कुठेही घराबाहेर न पडता घरच्या घरी ह्या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. ही कार्यशाळा ऑनलाईन असल्याने फक्त पुण्यातील नव्हे तर महाराष्ट्रभरातील सर्वांसाठी खुली आहे. कार्यशाळा, रविवार,दिनांक २९ मे २०२२ रोजी सकाळी 11 ते 1.30 या वेळेत Zoom application वर आयोजित करण्यात आलेली आहे.

या कार्यशाळेला प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

Kedar Athavale

त्याचप्रमाणे ए के स्टुडीओचे संचालक श्री. केदार आठवले, जे गेली १५ वर्षे व्हॉईस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत हे व्हॉईस कल्चर, व्हॉईस मॉड्युलेशन, व्हॉईस ओव्हर टेक्निक्स इत्यादीसाठी गरजेची असणारी तंत्र याची माहिती देतील आणि प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील.

तसेच सर्व वयोगटातील लोकांसाठी ए के स्टुडीओ, पुणे यांच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले आणि अनेक, या आवाजाच्या दुनियेतील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभरातील सगळ्यांसाठी Online तसेच Offline प्रशिक्षण वर्ग लवकरच सुरु होत आहेत.

ऑडिओबुक्स, कार्टून फिल्म्स, multilingual dubbing, रेडिओ वरील जाहिराती, e-learning, documentaries या सगळ्यांसाठी तुम्हाला आवाज द्यायचं स्वप्न आहे ना? तर हि कार्यशाळा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल!

QR code for registration

ए के स्टुडीओ, पुण्यातल्या ५ शाखांच्या माध्यमातून, गेली १५ वर्ष, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.. तुमच्या शहरातील इतर स्टुडिओमध्ये काम मिळवण्यासाठी व्हॉईस डेमो portfolio मार्फत सर्व प्रकारचे मार्गदर्शनही करण्यात येईल.

तसेच ज्यांना घरबसल्या Home Recording Setup तयार करून, Recording करून, अर्थार्जन करण्यासाठी देखील सर्व प्रकारचे मार्गदर्शन ए के स्टुडिओ तर्फे केले जाईल.

ही ऑनलाईन कार्यशाळा सर्वांसाठी मोफत आहे. मात्र त्यासाठी पूर्व नावनोंदणी अत्यावश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT