Viral Video Of Youth Performing Stunts On Mumbai Roads Esakal
मुंबई

Stunt On Mumbai Roads: रस्त्यावर जीवघेणे स्टंट, मुंबई पोलिसांनी दाखवला हिसका; तरुण हात जोडत म्हणाला...

Viral Video: अलिकडे आपण सतत अशा बातम्या वाचतो, पाहतो ज्यामध्ये स्टंट करताना कोणी हात गमावतेय तर कोणी पाय गमावतेय. इतकेच नाही तर या स्टन्टच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत.

आशुतोष मसगौंडे

सोशल मीडियाचा वापर वाडल्याने कंटेंट क्रिएशनच्या नावावर आज लोक काहीही करायला लागले आहेत. असे करताना हे लोक दुसऱ्यांना त्रास होईल याच विचार तर करतच नाहीत पण स्वताचीही काळजी घेत नाही.

अलिकडे आपण सतत अशा बातम्या वाचतो, पाहतो ज्यामध्ये स्टंट करताना कोणी हात गमावतेय तर कोणी पाय गमावतेय. इतकेच नाही तर या स्टन्टच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत.

आशात आता मुंबई पोलिसांनी असे जीवघेणे स्टन्ट्स करणाऱ्या मुंबईतील काही तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबई ट्राफीक पोलिसांनी इन्टाग्रामवर याबाबतची पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये दो व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. एक आहे स्टन्ट करणाऱ्यांचा आणि दुसरा पोलिसांसमोर माफी मागणाऱ्या एका तरुणाचा.

यावेळी मुंबई पोलिसांनी लिहिहे आहे की, "आझाद मैदान पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी चेंबूर येथील एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने त्याच्या मित्रांसह मुंबईतील विविध ठिकाणी धोकादायक स्टंट करत त्याचे व्हिडिओ सोशल मीडिया साइटवर अपलोड केले होते."

यावेळी मुंबई ट्राफिक पोलिसांच्या इन्स्टाग्राम पेजवर स्टंट करणाऱ्या तरुणाचा माफी मागणार व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, " 4 जूनच्या रात्री मी माझ्या मित्रांबरोबर साऊथ मुंबईमधील विविध ठिकाणी स्टंट्स केले होते. त्यानंतर माझ्यावर आझाद मैदान पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे."

दरम्यान मुंबईसह इतर मोठ-मोठ्या शहरांपासून गाव खेड्यांपर्यंत हे स्टन्ट्सचे लोन पसरले आहे. असे धोकादायक स्टन्ट करत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात हे तरुण व तरुणी हात, पाय आणि जीवही गमावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT