पादचारी पुलांच्या कामाला वेग
पादचारी पुलांच्या कामाला वेग 
मुंबई

पादचारी पुलांच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कमकुवत झालेल्या पादचारी पुलांची पावसाळ्यानंतर दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. वर्षभरात या कामाला वेग येणार आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालया पूल दुर्घटनेत मार्चमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.   

मरिन लाईन (उत्तर दिशेचा), चर्नी रोड (उत्तर दिशेचा), ग्रॅण्ट रोड (दक्षिण दिशेचा), मुंबई सेंट्रल (दक्षिण दिशेचा), माहीम (दक्षिण दिशेचा), वांद्रे (दक्षिण दिशेचा), अंधेरी (मधला) आणि गोरेगाव (मधला) स्थानकातील पुलांचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय, इतर सहा पुलांसाठी ४० कोटी ७२ लाखांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून लवकरच ते काम सुरू होणार आहे. यात मरिन लाईन्स (दक्षिण), चर्नी रोड (मधला), ग्रॅण्टरोड (उत्तर), दादर (दक्षिण), खाररोड (दक्षिण) आणि विलेपार्ले (दक्षिण) पुलाचा समावेश आहे. वानखेडे स्टेडियमला जोडणाऱ्या दोन पुलांचाही या १६ पुलांमध्ये समावेश आहे. हे दोन्ही पूल मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे आहेत. त्यामुळे या दोन पुलांची डागडुजी करण्याबाबत रेल्वेने तीन वेळा मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र पाठवले आहे; मात्र अद्याप त्यावर असोसिएशनने कोणतेही उत्तर दिलेले नाही, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. असोसिएशनने मार्च २०२० पर्यंत पुलांची पुनर्बांधणी केली नाही, तर रेल्वेतर्फे पूल पाडण्यासाठी दबाव टाकला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

याशिवाय, रेल्वे बोर्डाने पश्‍चिम मार्गावरील तीन नवे पादचारी पूल बांधण्यास मंजुरी दिली आहे. अंधेरी स्थानकात उत्तर दिशेला सहा मीटर रुंद पूल मेट्रो स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. त्याकरिता १३ कोटी ५९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. नायगाव स्थानकात चार कोटी ९५ लाखांचा; तर विरार स्थानकात नऊ कोटी २५ लाखांचा नवा पूल उभारण्यात येणार आहे. 

पुलांची सद्यस्थिती
एकूण पादचारी पूल : १२०
जुने व कमकुवत : १६
दुरुस्तीचे काम सुरू : ८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT