मुंबई

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत भूमिका स्पष्ट करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश...

सुनिता महामुनकर

मुंबई : देशात कोरोनाचे संकट कायम असतानाही विद्यापीठ अनुदान आयोग पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परिक्षा घेण्याबाबत आग्रही आहे. यूजीसीने जाहीर केलेल्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेवर आज न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. युजीसीने परीक्षा घेण्याचे समर्थन केले असून परीक्षांची तयारी करायला अद्याप अवधी आहे, असे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्यासाठी भूमिका दाखल करावी असे खंडपीठाने सांगितले. मात्र, परीक्षांवर अंतरिम स्थगिती देण्याचे निर्देश देण्यासही खंडपीठाने नकार दिला. 

आठशे विद्यापीठांपैकी दोनशे विद्यापिठांच्या परीक्षा झाल्या सुमारे 390 विद्यापीठ परीक्षेची तयारी करत आहेत, अशी माहिती यूजीसीकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली. महाराष्ट्रासह दिल्ली आणि अन्य राज्य सरकारने परीक्षा रद्द केल्या आहेत. आपात्कालीन परिस्थिती नुसार हा निर्णय घेण्यात आला असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

सर्व पक्षकारांनी प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीही पुढील महिन्यात होणार आहे. याचिकेची पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी निश्चित केली असून अंतरिम आदेश मिळण्याबाबत सुनावणी होणार आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST workers DA: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात वाढ; वेतन, पेन्शनवरही चर्चा, प्रताप सरनाईकांची घोषणा

Women's T20 World Cup 2026: १२ संघ, २४ दिवस अन् ३३ सामन्यांचा थरार; भारताचे सामने कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या सर्वकाही

Farmers Protest March: उद्योगपतींची कर्जे सरसकट माफ; मग शेतकऱ्यांवर कर्जमाफीच्या अटींचे ओझे का?

Latest Marathi News Live Update : परिवर्तन आघाडीच्या नगरसेवकांची बावनकुळे यांनी घेतली भेट, राजकीय चर्चांना वेग

Anvay Dravid In India U19 Team : राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड! श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI ची घोषणा, संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT