पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...

हे काम करण्यास अर्थातच लॉकडाऊनचा फायदा झाला. या कालावधीत रेल्वेची वाहतूक कमी असल्यामुळे वेगाने काम पूर्ण करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यामुळे आता या मार्गावरील सर्वच रेल्वेंची गती वाढणार आहे. 

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...

मुंबई : मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा रेल्वेने चांगला उपयोग करून घेतला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामेही रेल्वेने पूर्ण केले. रुळ बदलवणे, ओव्हरहेड वायर्स बदलवणे, सिग्नल यंत्रणा अद्ययावत करणे, रेल्वेमार्गालगत गाळ काढणे आदी काम पूर्ण करण्यात आली. एवढंच नव्हे तर पश्चिम रेल्वेवरील खार आणि वांद्रे दरम्यानच्या दीड किलोमीटरवरील रेल्वेमार्ग अद्ययावत केल्याने पश्चिम रेल्वेची गती वाढण्यास मदत होईल..

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

खार आणि वांद्रे दरम्यानची असलेली वेगमर्यादा ही चर्चगेट ते विरार दरम्यानची सर्वाधिक होती. त्यामुळे या मार्गावर ताशी 60 किलोमीटरने रेल्वे धावत होत्या. मात्र आता या टप्प्यातही शंभर किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार असल्याचे वृत्त आहे. या वाढीव वेगामुळे प्रत्येक रेल्वेची या टप्प्यातील प्रवासाची वेळ 30 सेकंदाने कमी होणार आहे. अर्थात त्याचमुळे रेल्वेच्या वेगात प्रकर्षाने वाढ होऊ शकेल. 

हृदयद्रावक ! एकाच वेळी पोलिस दलात सहभागी झालेल्या जुळ्या भावांवर कोरोनाने एकत्रच घातला घाला...

वांद्रे आणि खार दरम्यान एकूण 17 टर्नआऊट पॉईंट आहेत. त्या ठिकाणी रेल्वे एका ट्रॅकवरुन दुसऱ्या ट्रॅकवर येते. त्यामुळे रेल्वेच्या वेगावर मर्यादा होती. म्हणून  त्याठिकाणी काम करण्यात आले तसेच चारशे मीटरचा ट्रॅक बदलण्यात आला. त्यामुळे रेल्वेची गती वाढणार आहे. हे काम करण्यास अर्थातच लॉकडाऊनचा फायदा झाला. या कालावधीत रेल्वेची वाहतूक कमी असल्यामुळे वेगाने काम पूर्ण करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यामुळे आता या मार्गावरील सर्वच रेल्वेंची गती वाढणार आहे. 

मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या पायरीवर? राजेश टोपे यांनी स्प्ष्टपणे केला 'मोठा' खुलासा...

दरम्यान, अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यानच्या फूट ओव्हर ब्रिजचे कामही आता पूर्ण झाले आहे. लॉकडाऊन कालावधीत पूर्ण झालेला तसेच वापरण्यास सुरुवात झालेला हा चौथा ब्रिज आहे.
---
संपादन ः ऋषिराज तायडे

loading image
go to top