मुंबई

आरोग्य केंद्रावर उपचारा अभावी महिलेचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी या तीर्थक्षेत्रा मधील आरोग्य सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांचे डॉक्टर, कर्मचारी तसेच औषध तूटवडा वाहन नसने यामुळे गेले वर्षभरा पासून येथील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. येथील ग्रामस्थांना त्यासाठी खाजगी दवाखाण्याकडे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी गेल्या वर्षभरा पासून आरोग्य सेवा कोलमडून पडली आहे. या केंद्रावर जिल्हा परिषदेकडून 2 निवासी डॉक्टर, तसेच, परिचारीका आदी सह विविध कर्मचारी नेमले आहेत. मात्र या ठिकाणी रात्री बेरात्री सर्प दंश, विंचू, मलेरिया ताप असे रुग्ण गेल्यास या ठिकाणी ना डॉक्टर, ना कुठला कर्मचारी यांचा ठाव ठिकाणा नसतो. आपातकालीन स्थितीत कुठलाही वैद्यकीय सेवा पुरवली जात नसल्याने वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राची तसेच कर्मचाऱ्यांच्या स्टाफबाबत चौकशी करावी व येथील आरोग्य सेवा सुरळीत करावी. अशी मागणी बाळ शास्त्री जांभेकर राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष दीपक हीरे यांनी ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारीयांचेकडे केली आहे. 

गेल्या महिन्यात या आरोग्यकेंद्रावर एका महिलेस हृदय विकारचा झटका आला होता. मात्र, 108 क्रमांकावरील रुग्णवाहीका, डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित नसल्याने वैद्यकीय सेवा न मिळल्याने सदर महिलेस प्राण गमवावे लागले. तरी प्रशासनाने या आरोग्य केंद्रकडे विशेष लक्ष् द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT