Crime
Crime 
मुंबई

महिलेला अश्‍लील संदेश पाठवणाऱ्यास अटक

सकाळवृत्तसेवा

मुंबई - विवाहितेला अश्‍लील संदेश पाठवणाऱ्या युवकाला वडाळा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्याने नुकतीच जम्मू-काश्‍मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेनजीक अटक केली. मेहफूज मोहम्मद राशिद खान (30) असे या युवकाचे नाव आहे.

वडाळा येथे राहणाऱ्या या विवाहितेस काही महिन्यांपूर्वी अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्‌सऍपवर एकामागोमाग एक अश्‍लील व्हिडिओ येऊ लागले. तिने याबाबत पतीला सांगितल्यानंतर त्याने त्या क्रमांकावर दूरध्वनी करीत जाब विचारला. त्या वेळी मेहफूजने त्याला शिवीगाळ केली. "आपको किसके पास जाना है जाओ, कोई मेरा कुछ नई बिघाड सकता,' असेही त्याने या दाम्पत्याला सांगितले.

विवाहितेच्या पतीने पाच जानेवारीला याप्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासादरम्यान मेहफूजचा क्रमांक जम्मू-काश्‍मीरमधील राजौरी गावातील असल्याचे आढळले. वडाळा पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण कक्षातील महिला अधिकाऱ्याने दोन शिपायांसह जाण्याची तेथे इच्छा दर्शवली. ते तिघेही 18 एप्रिलला जम्मू-काश्‍मीरसाठी रवाना झाले. अनोळखी भागांत मेहफूजला शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या.

मात्र, स्थानिक पोलिसांच्या मदतीने शिताफीने मेहफूजला ताब्यात घेत या तिघांनी त्याला सोमवारी मुंबईत आणले. वडाळा पोलिसांनी त्याच्याविरोधात भा. दं. संहितेचे कलम 354(अ)(1), (3), माहिती तंत्रज्ञान कायदा 67(अ) अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT