छायाचित्र : मिलिंद नार्वेकर
छायाचित्र : मिलिंद नार्वेकर 
मुंबई

निवडणुकीमुळे महिलावर्गाला घाम

शर्मिला वाळुंज

ठाणे : दिवाळी सण तोंडावर आला असून महिलावर्गाला घर साफसफाईचे वेध लागले आहेत. सणाच्या तोंडावर नेमक्‍या निवडणुका आल्या. त्यात घरकाम करणाऱ्या बहुतांश महिला या प्रचारासाठी जात असल्याने घरकामासाठी कामगार महिला मिळेनाशा झाल्या आहेत.

निवडणूक प्रचार काळात कामगार महिला सुट्टीवर गेल्याने आधीच घरातील रोजच्या कामांचा ताण महिलांवर आला असून त्यात साफसफाईचे अधिकचे काम कसे करायचे, या विचारानेच महिलावर्गाला घाम फुटला आहे. या आठवड्यात प्रचार संपत असून एकच शनिवार-रविवार सुट्टीचा दिवस सफाईसाठी मिळत आहे. त्यामुळे या दिवशी कामगार महिला आपल्याकडे कशी येईल, यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने या दिवसांत रॅली, घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर सर्वपक्षीयांचा जोर आहे. यासाठी दिवसाचे वेतन देऊन कार्यकर्त्यांची जमवाजमवही केली जाते. एका दिवसाचे पाचशे ते हजार रुपये त्यासोबतच जेवण, नाश्‍ता मिळत असल्याने घरकामाला दांडी मारून अनेक घरकामगार महिला या दिवसांत प्रचाराला जाण्यास प्राधान्य देतात. घरकामास दांडी मारल्याने घरातील कामांचा ताण महिलावर्गावर पडत आहे. त्यातच निवडणुकांची धामधूम संपत नाही, तोच दिवाळीला सुरुवात होते. त्यामुळे या दिवसांतच घराची साफसफाई करून पुढील आठवड्यात फराळ करण्यास प्राधान्य देण्याचे नियोजन अनेक महिलावर्गाचे आहे. काही महिला उपलब्ध असल्या तरी त्या अवाच्या सव्वा दर आकारत असल्याने आपली रोजचीच कामवाई बाई बरी, असा महिलांचा सूर आहे. 

गेले चार दिवस आमच्या घरी घरकामास येणाऱ्या काकी आलेल्या नाहीत. वैयक्तिक कामासाठी त्यांनी सुट्टी घेतल्याचे सांगून त्या प्रचारास जात आहेत. सुट्टी घेतल्याने त्यांना आपण काही बोलूही शकत नाही; परंतु आता दिवाळी तोंडावर आल्याने घराची साफसफाई, फराळाचे कधी करायचे, हा प्रश्नच आहे. रोजच्या कामाच्या व्यापात वेगळा असा वेळ मिळत नाही. त्यात आता एकच शनिवार-रविवार हातात असल्याने नक्की काय करायचे, याचा ताण आहे.
- रसिका शेलार, नोकरदार महिला

घराची साफसफाई करण्यासाठी मी नेहमी कोणाला तरी मदतीला घेते; परंतु या वेळेस अनेक महिला या प्रचारात व्यग्र असल्याने त्यांची वेळच मिळत नाही. प्रचार संपल्यानंतर येऊ, असे त्या सांगत आहेत; परंतु दोन-तीन जणांची 
त्यांनी वेळ आधीच घेतल्याने मोठी कसरत करावी लागणार आहे. 
- श्‍यामली शेलार, गृहिणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT