मुंबई

हॅंकॉक ब्रिजचे काम परवानग्यांमध्ये अडकले 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : डोंगरी-माझगाव परिसराला जोडणारा ब्रिटिशकालीन हॅंकॉक ब्रिज धोकादायक ठरल्याने चार वर्षांपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. ब्रिज पाडून या ठिकाणी नवीन ब्रिज बांधण्यात येणार होता; मात्र यासाठी आवश्‍यक परवानग्या मिळत नसल्याने नवीन पुलाचे काम ठप्प आहे. पुलाचे काम सुरू करून नवीन पूल उभारावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

डोंगरी-माझगावला जोडणारा ब्रिटिशकालीन हॅंकॉक ब्रिज 2014 रोजी वाहतुकीस धोकादायक घोषित करण्यात आला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाची परवानगी घेऊन पालिकेने 2017 रोजी हा ब्रिज पाडला. या ठिकाणी केवळ 18 महिन्यात नवीन ब्रिज बांधणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले होते; मात्र चार वर्षे झाली तरी ब्रिज उभारणीचे काम सुरू झालेले नाही.

पालिकेच्या दिरंगाईचा फटका या परिसरातील रहिवाशांना आणि प्रवाशांना बसत आहे. हा ब्रिज पाडल्याने डोंगरी आणि माझगावदरम्यानचा प्रवास लांबला आहे. एका परिसरातून दुसऱ्या परिसरात जायचे असल्यास वाहनचालकांना 7 किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालून जावे लागत आहे. यामुळे विलंब तर होतोच; मात्र पेट्रोल-डिझेलची नासाडी होत असल्याने रहिवासी त्रासले आहेत. 

चार वर्षे झाली तरी हॅंकॉक ब्रिजचे काम का बंद आहे, याबाबत आरटीआय कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना पालिका आणि रेल्वे प्रशासनाने उडवाउडावीची उत्तरे दिली. हा ब्रिज खरेच धोकादायक होता का, अशी विचारणा करत कागदपत्रांची मागणी केली असता, रेल्वे प्रशासनाने अशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे शेनॉय यांना कळवले. यामुळे हा ब्रिज धोकादायक नसेल, तर उगाच का तोडला, असा प्रश्न शेनॉय यांनी उपस्थित केला आहे. 

पालिकेतर्फे 18 महिन्यांत ब्रिजचे बांधकाम होणार होते; मात्र चार वर्षांनंतरही त्याचे काम सुरू झालेले नाही. ब्रिज धोकादायक असल्याची कागदपत्रे रेल्वे प्रशासनाकडे नसणे, हे तर धक्कादायक आहे. रेल्वे आणि पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
- कमलाकर शेनॉय, आरटीआय कार्यकर्ते 


अखेर न्यायालयात धाव 
नवीन ब्रिज बनवण्यासाठी काही झाडे तोडावी लागणार आहेत. यासाठी पालिकेने वृक्षप्राधिकरण समितीकडे 3 महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केला; मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांनी सांगितले. तसेच रेल्वेने ब्रिजच्या आराखड्याला मंजुरी न दिल्यामुळेदेखील काम रखडल्याचे त्यांनी सांगितले. 
ब्रिजची माहिती घेण्यासाठी पालिका आणि रेल्वे प्रशासनाचे उंबरडे झिजवून त्रासलेल्या कमलाकर शेनॉय यांनी यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT