Worli Accident Case esakal
मुंबई

Worli Accident Case : वरळीतला तो अपघात की हत्या? आरोपीने गाडी रिव्हर्स घेऊन महिलेच्या अंगावर का घातली? 'सीसीटीव्ही'चा पुरावा कोर्टात

मुख्य आरोपी मिहीरची आर्थिक परिस्थिती आणि त्याच्या वडिलांचे राजकीय वलय पाहता तो परदेशात पळून जाऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता वरळी पोलिसांनी देशभरातील सर्व विमानतळांना लूक आऊट नोटीस जारी केली. तसेच सहा पथके तयार करत त्याचा शोध घेतला जात आहे.

संतोष कानडे

Mumbai Accident Updates : वरीळमध्ये रविवारी पहाटे कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला धडक देऊन महिलेला फरफट नेल्याची घटना घडली होती. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी आणखी एक नवीन माहिती पोलिस तपासामध्ये पुढे येत आहे. आरोपी मिहीर शाह याने त्याची अलिशान गाडी रिव्हर्स घेऊन पुन्हा महिलेच्या अंगावर घातल्याचा प्रकार पुढे येत आहे.

'साम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, वरळी अपघात प्रकरणात कायदे तज्ज्ञांमध्ये मतमतांतरं होत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर पेच वाढला आहे. कावेरी नाखवा यांना दीड किलोमीटर फरफटत नेल्यानंतर आरोपींने त्यांना आधी गाडीपासून बाजूला केलं, त्यानंतर गाडी रिव्हर्स घेत कावेरी यांच्या अंगावर गाडी चढवली. त्यानंतर आरोपी पसार झाला.

या प्रकरणाचा उलगडा सीसीटीव्हीमध्ये झाल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला आहे. कावेरी नाखवा यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्या मयत झाल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह आणि त्याचा कार चालक राजऋषी बिडावत तसेच स्वतः राजेश शाह यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी मिहीरची आर्थिक परिस्थिती आणि त्याच्या वडिलांचे राजकीय वलय पाहता तो परदेशात पळून जाऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता वरळी पोलिसांनी देशभरातील सर्व विमानतळांना लूक आऊट नोटीस जारी केली. तसेच सहा पथके तयार करत त्याचा शोध घेतला जात आहे.

...तर कावेरी यांचा जीव वाचला असता

मिहीर चालवत असलेल्या बीएमडब्ल्यू कारने प्रदीप व कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. धडकेमुळे दोघे बीएमडब्ल्युच्या बोनेटवर आले. त्याचवेळी मिहीर याने ब्रेक दाबला. या झटक्यामुळे प्रदीप डाव्या बाजूने खाली पडले. मात्र कावेरी यांची साडी चाकात अडकल्यामुळे त्या गुरफटल्या आणि बोनेटवरून सरकून चाक आणि बंपरमध्ये अडकल्या. याची जाणीव कार चालविणाऱ्या मिहीरला आणि चालक असलेल्या बिडावत याला होती. मात्र मिहीर याने कार थांबवली नाही. प्रदीप हे कारमागे धावत थांबा..थांबा म्हणत होते. परंतु मिहीरने ऐकलं नाही. या अपघातात कावेरी यांचा जीव गेला. अपघात झाला तेव्हा मिहीर दारूच्या नशेत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT