Birthday
Birthday Sakal
मुंबई

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना तरूण भाजला; अंबरनाथमधील घटना

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आपल्यापैकी अनेक जण रस्त्यावर रात्रीच्यावेळी वाढदिवस साजरे करणारे घोळके बघत असतो. अनेकदा या मुलांकडून वाढदिवस साजरा करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या जातात. मात्र, काही वेळा नको ते प्रकार करणे किती महागात पडू शकते हे समोर आणणारा प्रकार अंबरनाथमधून समोर आला आहे. वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना तोंडात जळती मेणबत्ती पकडण्याने बर्थडे बॉय होरपळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथमधील एका मुलाचा वाढदिवस होता. यासाठी बर्थडे बॉयचे काही मित्र सेलिब्रेशनसाठी एकत्र जमले होते. त्यावेळी ज्या मुलाचा वाढदिवस होता त्याने तोंडात जळती मेणबत्ती पकडली आणि मात्र असे करणे या मुलाला चांगलेच महागात पडले आहे. संबंधित मुलागा त्याच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होता. त्यावेळी त्याने त्याच्या तोंडात मेणबत्ती पकडली होती. त्याचवेळी या मुलाच्या मित्राने त्याच्या अंगावर पीठ टाकले आणि त्यामुळे एकदम आगीचा भडका उडाला.

याघटनेत संबंधित मुलाचे कपडे जळाले असून तो किरकोळ जखमी झाल्याचे समजत आहे. घटनेनंतर मुलावर खासगी रूग्णालयात उपाचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना अशा प्रकारे चुकीचे प्रयोग करणाऱ्यांनी यातून धडा घेणे गरजेचे आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात एखाद्याच्या जीवाशी महागात पडू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT