Agitation
Agitation 
मुंबई

युवक कॉंग्रेसचे अभिनव "निषेधासन'

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्य सरकारच्या चार वर्षेपूर्तीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने अभिनव असे "निषेधासन' आंदोलन पुकारले आहे. मागील चार वर्षांत सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा घेत वेगवेगळ्या मार्मिक पद्धतीने त्यांना योगासनाचं व्यंग्य केले आहे. बुधवारी राज्यभरात युवक कॉंग्रेस हे निषेधासन आंदोलन करणार आहे.

यात भक्‍तासन, मौनासन, क्‍लिनचिटासन, महागाईआसन, गाजरासन, ट्रोलासन, वाचाळासन, राफेलासन, धमकीआसन, बेरोजगारासन, अभ्यासासन, अशा प्रकारचे व्यंग्य करत चारोळ्यामधे युवक कॉंग्रेसने सरकारच्या अपयशावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सत्यजित तांबे यांनी युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर युवक कॉंग्रेस आक्रमक होत आहे. रस्त्यावरील आंदोलनाचा कार्यक्रम राबवत सरकारविरोधात युवक रस्त्यावर उतरतील, याची रणनीती युवक कॉंग्रेसने आखली आहे. या अगोदरही वर्धा येथील राहुल गांधी यांच्या दौऱ्यात युवक कॉंग्रेसने सरकारविरोधात तीव्र शब्दांत टीका करणारे भित्तिफलक रंगवले होते. तर, पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काळे फासले होते. चार वर्षेपूर्तीनिमित्त निषेधासन असे अभिनव आंदोलन करताना या सरकारला योगाचीच भाषा कळते, अशी टीका प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT