मुंबई

#WorldDrugDay : तरुणाईवर अमली पदार्थांचा विळखा

सकाळ वृत्तसेवा

बेलापूर - नवी मुंबईतील तरुणाईवर अमली पदार्थांचा विळखा वाढताना दिसत आहे. अमली पदार्थांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांच्या जनजागृती व पेट्रोलिंगच्या कारवाया वाढल्या आहेत; मात्र संथ न्यायालयीन प्रक्रियेचा या कारवायांना फटका बसत आहे.

नवी मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाच्या अहवालानुसार जून २०१६ पासून शहरामध्ये अमली पदार्थांसंबंधात एकूण ८९  गुन्हे दाखल झाले. यातील २६ गुन्हे २०१९ मध्ये दाखल झाले. याप्रकरणी मागील चार वर्षांमध्ये १४१ आरोपींना अटक झाली; मात्र यातील फक्त एकालाच शिक्षा झाली. यापैकी ११९ आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून ११ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. एकूण ४ कोटी २१ लाख रुपये किमतीचा माल आत्तापर्यंत जमा करण्यात आला आहे. यामध्ये गांजा, अफू, चरस, ब्राऊन शुगर, मेथक्‍युलॉन, मेथाफेटामाईन, केटामाईन यांचा समावेश आहे. शहरात चांगले पुनर्वसन केंद्र नसणे, हेदेखील अमली पदार्थ गुन्ह्याचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत आहे, असे मत रिद्धवी सायकॅट्रिक हॉस्पिटल डॉ. माधवी क्षीरसागर यांनी व्यक्त केले. 

आम्ही महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृती मोहिमा राबवत आहोत. आत्तापर्यंत २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यासोबतच शहरातील पेट्रोलिंगही वाढवण्यात आली असून दोषींना शिक्षा मिळावी यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत.
- तुषार दोशी, डीसीपी, क्राईम ब्रॅंच

आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये महाविद्यालयीन तरुणांचे प्रमाण जास्त आहे. चरस, गांजा, कोकेन, मिथाईल व  भांग या पदार्थांचे सेवन तरुण जास्त करतात, असे आढळून आले आहे.
-  डॉ. माधवी क्षीरसागर, रिद्धवी हॉस्पिटल आणि डीॲडिक्‍शन सेंटर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT