Students Exam
Students Exam esakal
नांदेड

परीक्षा ऑफलाइन घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनामुळे अनेकांच्या जिवनावर बरा वाईट परिणाम झाला. मात्र कोरोना काळात देखील सरकाराने आॅनलाइनचे धडे मिळत होते. त्यामुळे परिक्षा आॅनलाइन की आॅफलाइन व्हाव्यात या भानगडीत न पडता आम्ही मनापासून अभ्यास केला आहे. तेव्हा परीक्षा आॅफलाइन झाल्या तर जिव तोडून अभ्यास केल्याचे सार्थक होईल असे वाटते. ह्या दहावी - बारावी परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या भावना आहेत.

‘सकाळ’ टीमने शहर व ग्रामीण भागातील दहावी - बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून आॅनलाइन परीक्षेपेक्षा आॅफलाइन परीक्षा घेण्यासाठी आग्रह दिसून आला. दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्या असताना काही संघटनांच्या वतीने बोर्डाच्या परीक्षा आॅनलाइन घेण्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा नेमक्या आॅनलाइन की आॅफलाइन होणार या बद्दल मनात शंका निर्माण होत आहेत. सरकार आणि संघटना यांच्यातील घोळ सुरु असल्याने त्याचा अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत असल्याचे त्यांचे मत आहे.

शिक्षण विभागाच्या वतीने बारावी बोर्डाच्या परीक्षेचे आॅनलाइन हॉलटीकीट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. परीक्षा अगदी काही दिवसावर येऊन ठेपल्या असताना देखील काही संघटना आॅफलाईन परीक्षेस विरोध करत आहेत. असे असले तरी, वर्षभरापासून जिव तोडून अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्या अभ्यासाचे चिज व्हावे असे मनापासून वाटत असून त्यासाठी परीक्षा ह्या आॅनलाइन ऐवजी आॅफलाइन परीक्षेतुन मनासारखी टक्केवारी घेता येईल असे वाटते. परीक्षा या बहुपर्याय पद्धतीने किंवा आॅनलाइन घेतल्या गेल्या तर त्यातुन नुकसान होण्याची भिती वाटत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या टिमकडे भावना व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT