pik vima logo.jpg 
नांदेड

१३ कोटी २४ लाखांचा विमा मंजूर....कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : मागील वर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी, उडीद या पिकांसाठी विमा मंजूर झाला होता. जिल्ह्यातील एकूण ८० महसूल मंडळापैकी लोहा तालुक्यातील कलंबर, माळाकोळी व लोहा या तीन सर्कल मधील विमा मिळणे बाकी होते. कंपनीने या सर्कलमधील ३६ हजार ४३३ शेतकऱ्यांना १३ कोटी २४ लाख ४३ हजार ४५० रुपयांचा विमा मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

तीन सर्कलना होती विमा मंजूरीची प्रतिक्षा
जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड, कलंबर बुद्रुक व लोहा या मंडळासह कापशी व शेवडी (बा) या सर्कलमधील काही शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१९-२० या वर्षातील विम्याची प्रतिक्षा होती. कंपनीने नुकताच हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. यापूर्वी जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी, उडीद या पिकासाठी ३१३ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला होता. तर तूर व कपाशीचा विमा अद्याप शिल्लक आहे. 

४३३ शेतकऱ्यांना १३ कोटी २४ लाखांचा विमा मंजूर
विमा कंपनीने नुकतेचा या भागातील शेतकऱ्यांना विमा मंजूर केला आहे. यात ३६ हजार ४३३ शेतकऱ्यांना १३ कोटी २४ लाख ४३ हजार ४५० रुपये पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. यात कलंबर सर्कल मधील १२ हजार ५४५ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा कोटी ४४ लाख, लोहा मंडळातील ११ हजार ३४० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन कोटी ९९ लाख, माळाकोळी सर्कलमधील १२ हजार ४५६ शेतकऱ्यांना तीन कोटी ७३ लाख मंजूर झाले आहेत. यासोबतच कलंबर बुद्रुक मधील ज्वारी उत्पादक दहा, कापशी मंडळ सात, लोहा ११, माळाकोळी तीन व सोनखेड एक अशा ३२ शेतकऱ्यांना एक लाख पंचवीस हजार तीनशे नव्वद रुपये विमा मंजूर झाला आहे.

सर्कलनिहाय सोयाबीन उत्पादक
कलंबर मधील १२ हजार ५४२ सोयाबीन उत्पादकांना सहा कोटी ५८ हजार रुपये, कापशी २९ शेतकऱ्यांना दोन लाख २७ हजार, लोहा मंडळातील ११ हजार ३४० शेतकऱ्यांना दोन लाख ९९ हजार ४६ हजार रुपये, माळाकोळी सर्कलमधील १२ हजार ४५६ शेतकऱ्यांना तीन कोटी ७३ लाख ५८ हजार रुपये, शेवडी बाजीराव आठ शेतकऱ्यांना ५५ हजार ७३२ व सोनखेड मधील २६ शेतकऱ्यांना दोन लाख ७२ हजार ४७ रुपये असे एकूण ३६ हजार ४०१ शेतकऱ्यांना १३ कोटी २३ लाख १८ हजार ५९ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. या भागातील एकूण ३६ हजार ४३० शेतकऱ्यांना १३ कोटी २४ लाख ४३ हजार रुपये विमा मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

यापूर्वी मिळाला ३१३ कोटी ६९ लाखांचा विमा
मागील हंगामात पाच पिकांसाठी १२ लाख पाच हजार ३५ अर्जदारांनी सहभाग घेऊन विमा हप्त्यापोटी ४९ कोटी ९५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. या विमा हप्त्यातून पाच लाख ८७ हजार ७७ हेक्टरवरील पिकांसाठी पीकविमा भरला होता. यातून दोन हजार २४२ कोटी ६१ लाख ४६ हजार ३४१ रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली होती. यापैकी सोयाबीन, ज्वारी व उडीद या पिकांसाठी पिकविमा भरलेल्या सहा लाख तीस हजार ९५७ शेतकऱ्यांना ३१३ कोटी ६९ लाख रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला होता. यात कपाशी तसेच तुरीचे संकलन बाकी असल्याने त्यांचा समावेश नाही. चार लाख १३ हजार २५८ हेक्टरवरील पिकांसाठी परतावा मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यात विम्याची जोखीम किती टक्के मंजूर झाली, याची माहिती मात्र मिळू शकली नाही. विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. यावेळी मात्र लोहा, माळाकोळी व कलंबर बुद्रुक या सर्कलमधील शेतकऱ्यांचा विमा मंजूर होणे बाकी होते, अशी माहिती विमा कंपनीच्या सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT