पसार असलेला हाच तो जुल्फेकार आरोपी
पसार असलेला हाच तो जुल्फेकार आरोपी 
नांदेड

दिड वर्षापासून फरार आरोपीस नांदेडमध्ये अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रल्हाद कांबळे

नांदेड : इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक हल्ला करुन दिड वर्षापासून पसार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अटक केलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई बुधवारी (ता. २३) पहाटेच्या सुमारास देगलूरनाका भागात केली.

याबाबत अधिक माहिती अशी की शहर व जिल्ह्यात फरार व पाहिजे आरोपी यांना अटक करण्यासाठी पोलिसांच्यावतीने शोध मोहीम राबविण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले पथक जिल्हाभरात तैनात केले आहे. पथकांमार्फत आरोपींच्या मुसक्या आवळणे सुरु आहे.

हेही वाचा - डेल्टा या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचं सांगितलं गेलं. मात्र, आता या व्हेरियंटचंच नवे म्युटेशन समोर आले आहे.

यातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांचे पथक नांदेड शहरातील इतवारा उपविभागात ता. २२ जूनच्या रात्री गस्त घालत होते. गस्तवर असलेले पथक प्रमुख श्री. काळे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी देगलूर नाका भागात सापळा लावून मागील दिड वर्षापासून पसार असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले. त्याची अधिकची चौकशई केली अशता त्याच्याविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला, हत्यार बाळगणे व दंगलीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजले.

येथे क्लिक करा - नविन कार घेण्यासाठी १० लाखाची मागणी करुन विवाहितेचा छळ

करबला रोड परिसरात राहणारा परंतु देगलूरनाका बरकत काॅम्पलेक्स परिसरात दबा धरुन बसलेला जुल्फेकार अहमद गुलाम अहमद असे त्याचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. पथकाने त्याची वैद्यकीय तपासणी करुन इतवारा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या पथकात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. मुंडे, शंकर म्हैसनवाड आणि श्री दासरवार यांनी परिश्रम घेतले. पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT