SVD_0900.JPG 
नांदेड

‘या’ कंटेनमेंट झोन मध्ये पाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्‍त सुनील लहाणे यांनी महानगरपालिका हद्दीतील नगिनाघाट गुरुद्वारा परिसर या क्षेत्रामध्‍ये कोविड-१९ चे रुग्‍ण आढळून आल्‍यामुळे नगिनाघाट गुरुद्वारा परिसर, गुरुद्वारा लंगरसाहेब कंपाऊंड, बडपुरा, शहिदपूरा, रामकृष्‍ण टॉकिज, परिसर या क्षेत्रामध्‍ये संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्‍हणून हे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. येथे उपाययोजना व नियोजनासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्‍ती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी एका आदेशाद्वारे केली आहे.  

या पाच अधिकाऱ्यांची केली नियुक्ती
क्षेत्रात विविध उपाययोजना व नियोजनासाठी नियुक्‍ती करण्‍यात आलेल्या या पाच अधिकाऱ्यांमध्ये नांदेडचे उपविभागीय दंडाधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर लतिफ पठाण, नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभारी उपायुक्‍त (सा.) अजितपालसिंघ संधू, नांदेड मनपा झोन क्र. चार वजिराबाद प्रभारी क्षेत्रीय अधिकारी प्रकाश गच्‍चे तर नांदेड वाघाळ शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बदियोद्दीन यांचा समावेश आहे.  

प्राप्‍त सुचनेनुसार नियोजन करावे
घोषीत केलेल्‍या कंटेनमेंट झोनमध्‍ये कोरोना रोगाचा प्रसार रोखण्‍यासंबंधाने तपशीलवार धोरण, करावयाच्या उपाययोजना वेळोवेळी जाहीर करण्‍यात आले आहे. त्‍या बाबत आरोग्‍य विभागाने सुध्‍दा प्रमाणित कार्यपध्‍दती जाहीर केली आहे. या नियुक्त अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तसेच शासन, आरोग्‍य विभागाकडून प्राप्‍त सुचनेनुसार नियोजन करुन केलेल्‍या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास वेळोवेळी अवगत करावे. जे कोणी व्‍यक्‍ती, समुह सदर आदेशाचे उल्‍लंघन करील, त्‍यांचे विरुध्‍द आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम, २००५ अन्‍वये व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी काढले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या अधिकारानुसार नियुक्ती 
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा १८९७ ता. १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार ता १४ मार्च २०२० रोजी अधिसुचना निर्गमित केली आहे. त्‍यानुसार कोरोना विषाणूचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना ज्‍या उपायोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषित केले आहे. त्‍यानुषंगाने या  कंटेनमेंट झोनमध्‍ये विविध उपाययोजना व नियोजनासाठी या अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे, असेही आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नमूद केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT