nanded
nanded Sakal
नांदेड

Nanded News : प्लॉट, फ्लॅट खरेदी करताना सावधान ; नांदेड शहरात फसवणुकीचे प्रकार वाढले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : तुम्ही नांदेडमध्ये किंवा शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये एखादा प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करणार असाल तर सावधान! कारण तुमची फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अनेक ठिकाणी प्लॉट, फ्लॅट खरेदी विक्रीमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले असून खरेदी करण्याआधी खातरजमा करूनच मग पुढील पाऊल उचलण्याची गरज आहे.

नांदेड शहर आणि परिसरात कोरोना संसर्ग होण्याआधी असलेले जागांचे भाव आणि कोरोना संसर्ग संपल्यानंतरच्या जागांच्या भावांमध्ये जवळपास दुप्पट फरक पडला आहे. कोरोनाच्या संसर्गामध्ये फ्लॅट, प्लॉट खरेदी आणि विक्रीचेही व्यवहार जवळपास ठप्पच होते. मात्र त्यानंतर नियमानुसार भाव वाढ होणे आवश्यक असताना अव्वाच्या सव्वा भाव झाले. त्यामुळे आताच्या परिस्थितीत प्लॅट, प्लॉट खरेदी करताना ग्राहकांची फसवणुक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे काळजीपूर्वक व्यवहार करावेत, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

नांदेड शहर आणि परिसरात विशेष करून ग्रामपंचायत क्षेत्रात मंजूर नकाशानुसार अनेक ठिकाणी कामे झाली नाहीत. तसेच एकच फ्लॅट, प्लॉट दोन किंवा त्याहून अधिक जणांना विक्री केल्याच्या घटना घडल्या आहेत. शासनाने वेळोवेळी सांगितलेल्या सूचना आणि आदेशाचेही अनेक ठिकाणी उल्लंघन झाले आहे. त्यामुळे त्याचा फटका नंतर खरेदी केलेल्या ग्राहकांना बसत आहे.

शहरातील गोदावरी व इतर नदीकाठी रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन झोन आहे. मात्र, त्या संदर्भातील माहिती अनेकांना नाही. तसेच प्रशासनाने काही जागांवर उद्यान, शाळा, रुग्णालय, मैदान, रस्ते, शासकीय इमारती आदी महत्वाच्या बाबींसाठी आरक्षण टाकलेले असते. त्या ठिकाणीही प्लॉट, प्लॅट किंवा घरे यांची खरेदी विक्री झाली आहे. त्यामुळे खरेदी करताना तहसील कार्यालयात महसूल तसेच नगररचना विभागाकडून मालकी हक्क व अकृषिक परवानगी याबाबतची खातरजमा करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT