file photo
file photo 
नांदेड

विनारॉयल्टी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला; सिंदखेड पोलिसांची कारवाई

साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन राजरोसपणे सुरु असून प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा घेत बेकायदेशीर वाहतूक स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी व पोलिस प्रशासनासमोर होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

माहूर तालुक्यातील काही ठिकाणचे वाळूघाटाचे लिलाव झालेले नाहीत. तरी देखील बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात वाळूचे बेकादेशीर उत्खनन करुन वाहतूक करणारे वाळूमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. माहूर तालुक्यातील पैनगंगा पात्रातून अवैधरित्या वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वाळू चोरांनी थेट नदीपात्रात ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत. 

पैनगंगा नदी पत्रातून होत असलेली अवैधरित्या वाळू चोरी ही जोमात सुरु असून रविवारी (ता. सात) रोजी माहूर तालुक्यातील पडसा शिवारात सकाळच्या सुमारास विना रॉयल्टी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला सिंदखेड पोलिसांनी पकडले. सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदशनखाली हवालदार श्री. सानप, पठाण, श्री. शेंडे, श्री. सोनसळे, श्री. पाटील यांनी ही कारवाई केली. विनापरवाना वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलिस ठाण्यात लावण्यात आले असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके करीत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT