dr. hanumant bhopale
dr. hanumant bhopale 
नांदेड

सातत्यात सामर्थ्य असते- डॉ. हनुमंत भोपाळे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आपले बऱ्याचदा कसे असते 'एकदा वाढली पंगत आणि जन्मभर बसली सांगत.' कोणत्याही क्षेत्रात सामर्थ्यशाली, यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी वेळेचे नियोजन (Planing) करून सातत्याने पाठपुरावा करत, परिश्रम घेत वाटचाल करावी लागते तेव्हा कुठे यश मिळते. थोर शास्त्रज्ञ एडिसन (Scientist Edison)यांना विजेच्या बल्बचा शोध लावण्यासाठी हजारदा प्रयत्न करावे लागले तेव्हा कुठे यश मिळाले. Consistency is strength- Dr. Hanumant Bhopale

एक- दोन वेळेस प्रयत्न करुन जमले नाही तर आपण हे मला जमत नाही म्हणून सोडून देतो. सोडून देऊन सामर्थ्य,यश मिळत नसते.थांबल्याने प्रवास होत नाही. संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की, सातत्याने अभ्यास करत गेलो तर यश मिळते.

हेही वाचा - नांदेड : अवघड क्षेत्रातील निकष पात्र शाळा अपात्र; शिक्षणाधिकाऱ्यांची मनमानी

ओली मूळ भेदी खडकाचे अंग | अभ्यासासी सांग कार्यसिद्धी|| आपल्याला घाई असते.

एकजण मित्र कंटिगसाठी म्हणजे केस कापण्यासाठी केशकर्तनालयात जाऊन थोडा वेळ थांबला. वेळ लागते गड्या इथे म्हणून दुसऱ्या ठिकाणी गेला. तिथेही चार माणसे होती. थोडा वेळ थांबला आणि इथेही थांबावे लागते म्हणून दुसऱ्या ठिकाणी गेला. शेवटी घरी परत आला. संयम सुटला की,यश हातचे जाते. निराशा पदरी येते. निराशेतून यशदायी इतिहास निर्माण होत नाही. संयम हेसुद्धा एक सामर्थ्य असून सातत्याने परिश्रम घेण्यासाठी या सामर्थ्याची गरज असते. प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट वेळ द्यावा लागतो.

बाळाला जन्म देण्याचा कार्यक्रम चार दोन महिन्यात आटपत नाही. एका व्यक्तीला अंड्यातून पिल्लू लवकर आले पाहिजे म्हणून घाई लागली होती.

त्याने एक दोन दिवस वाट पाहिली.पिल्लू काही बाहेर येईना आणि त्याला दम धरवेना त्यांने अंड्यावर बसलेल्या कोंबडीला बाजूला केले आणि अंड्यातून पिल्लू काढण्याची घाई केली. पिल्लू मिळाले नाही.

आज एखादं काम केले की, उद्याच यश मिळावे आणि लोकांनी विजयी मिरवणूक काढावी असे म्हटले तर तसे होत नाही. सातत्याने विधायक काम करणाऱ्यांची जनता, शासन आणि इतिहास दखल घेतो याला अनेक पुरावे आहेत. पायगें जादव या आदिवासी भागात राहणाऱ्या तरुणाने अनेक वर्षे सातत्याने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करुन मोठ्या कष्टाने जंगलाची निर्मिती केली. काही जण कामासाठी नसतात पण काम नासवण्यासाठी आवर्जून असतात. यांना विघ्नसंतोषी म्हणतात.

अशाच काही 'कामनासव्या' महाप्रतापींनी पायगें यांच्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.त्यांची तक्रार वनविभागाकडे करून बघितले पण काही उपयोग झाला नाही. याचा अर्थ तुम्ही विधायक, चांगले काम करत असतानाही विरोध करणारे, अडथळे आणणारे, उत्साह कमी करणारे नासके मुद्दाम आडवे येतात अशा वेळी आपण उडून पुढे गेले पाहिजे. सहकार्य करणारे सज्जनही भेटतात.

नदी रस्ता शोधत निघालेली असताना वाटत दगड आले म्हणून ती थांबली नाही,ती दगडाला वळसा घालून पुढे गेली.असे पुढे जाणारे माणसे पुढेच जात राहतात. काही जण जाग्यावर बसून मला होत नाही, मला जमत नाही.मी करत नाही म्हणून करकर (भांडणं) करीत राहतात. अशा व्यक्तींना यश मिळत नाही, मग ते वेगवेगळ्या विवंचनेत जगतात. अपयशी ठरतात. असे होऊ नये असे वाटत असेल तर एक विशिष्ट ध्येय निश्चित करून सातत्याने वाटचाल करणे यशदायी ठरते. वाटच ' वाट' दाखवते, चालू लागलो की, प्रवास होतेच यावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करत राहिल्यास विजय आपलाच आहे.

- डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांच्या फेसबुक पेजवरुन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT