malakoli.jpg 
नांदेड

जर्मनीतील म्युनिक शहरात ‘डिजिटल’ महाराष्ट्र दिन

एकनाथ तिडके


माळाकोळी, (ता.लोहा, जि. नांदेड) ः महाराष्ट्राचा झेंडा आता सातासमुद्रापार रोवला गेला आहे. जर्मनीतील म्युनिक शहरात महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वतीने या वर्षी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. माळेगावचे भूमिपुत्र संगणक अभियंता अशोक धुळगुंडे व इतर महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनी एकत्र येत महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. जर्मनीतील म्युनिक शहरात महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. दरवर्षी हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या रंगमंचावर शेकडो मराठी बांधवांच्या उपस्थितीत साजरा होतो. पण या वर्षी कोरोना संकट आणि त्यामुळे असलेले लॉकडाउन यामुळे सार्वजनिक कार्यक्रम करण्यावर बंधने आली होती. मंडळाच्या कार्यकारिणीने यावर एक अभिनव उपाय शोधून काढला आणि त्यातूनच साजरा झाला मंडळाचा ‘डिजिटल’ कार्यक्रम ‘जय जय महाराष्ट्र माझा’ कार्यक्रम.


सभासदांसाठी थेट प्रसारित 
म्युनिक शहरातील स्थानिक कलाकार, यात कवी, लेखक, गायक, वादक, अभिनेते, नर्तक यांनी आपापले कलाप्रकार स्वतःच्या घरी व्हिडिओ स्वरूपात तयार करून ते मंडळाला पाठविले. मंडळाचे हरहुन्नरी कार्यकारिणी सदस्य विपीन गोंडचवर यांनी आधुनिक सॉफ्टवेअरचा खुबीने वापर करून जणूकाही प्रत्यक्ष रंगमंचावर कार्यक्रम साजरा होतोय अशी अनुभूती यावी, अशी एक अतिशय सुंदर फिल्म त्यातून तयार केली. एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम फिल्मच्या स्वरूपात ‘यू-ट्युब’ या सामाजिक माध्यमातून मंडळाच्या सर्व सभासदांसाठी थेट प्रसारित करण्यात आला.


महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा
कार्यक्रमाच्या सुरवातीला मंडळाचे अध्यक्ष अभिजित माने यांनी सर्वांचे स्वागत केले. सचिव अशोक धुळगंडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली, तर कार्यकारिणी सदस्य विजय गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. म्युनिक येथील भारतीय दूतावासाचे प्रमुख श्री. मोहित यादव यांनीही आवर्जून व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कलाकार म्हणून सहभागी झालेल्या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी अगदी आवर्जून महाराष्ट्र दिनाच्या डिजिटल कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा व्हिडिओ संदेशाद्वारे पाठविल्या. यात श्रीधर फडके, डॉ. सलील कुलकर्णी, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, महेश काळे, सलील तांबे, त्यागराज खाडिलकर, आनंद भाटे, प्रा. दीपक देशपांडे, पुष्कर श्रोत्री, मृन्मयी देशपांडे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष अभिजित माने, सचिव अशोक धुळगंडे, खजिनदार वैभव डोलारे यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य योगेश वाडकर, राहुल जोशी, विजय गायकवाड, विपीन गोंडचवर, संदीप मुसळे आणि दुर्गा खटखटे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT