जागतिक पर्यावरण दिन 
नांदेड

पर्यावरण दिन : ऋतुचक्रातील बदल थांबविण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावणे आवश्यक

जल, जमीन आणि जंगल हे पर्यावरणाचे कान, नाक आणि डोळे आहेत. यापैकी कोणत्याही घटकाला झालेली इजा, पर्यावरणासाठी घातक ठरत आहे.

प्रमोद चौधरी

नांदेड ः दरवर्षी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा होतो. यंदा कोरोनाच्या या संकट समयी या वर्षाच्या पर्यावरण दिनाची थीम ‘इकोसिस्टीम पुन्हा स्थापित करणे’ ही आहे. आजच्या वर्तमानात परिस्थितीमध्ये वर्षभर पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ व सुंदर पर्यावरण देणे हे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्याचे पालन करून पृथ्वीला निसर्ग स्वर्ग बनवण्याचा संकल्प या पर्यावरण दिनी आपण सर्वजण करु या.

जल, जमीन आणि जंगल हे पर्यावरणाचे कान, नाक आणि डोळे आहेत. यापैकी कोणत्याही घटकाला झालेली इजा, पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड व मिथेन या वायूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्यावरण ही आज जगासमोरील ज्वलंत समस्या बनली आहे. निसर्ग संपत्तीचा ऱ्हास, पर्यावरण ऱ्हास, महापूर, चक्रीवादळे, दुष्काळ, जंगलातील वनवे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील होणारी वाढ, ऋतुचक्रातील बदल, विविध प्रकारची महामारी अशा भयानक संकटांनी अनेक वनस्पती, पशु- पक्षी यांच्या जाती नष्ट केल्या असून, त्याची भयानकता मानवाच्या अस्तित्वावरही घाला घालत आहे.

हेही वाचा - निसर्गाचा ऱ्हास थांबवणे व परिसंस्थेच्या संवर्धनासाठी तापमानवाढ रोखणे आणि त्याकरता कर्बोत्सर्जन घटवणे आवश्यक आहे. पॅरिस कराराचे पालन हे त्याला उत्तर आहे. आजच्या (ता.५) जागतिक पर्यावरणदिनी आपण त्या दिशेने टाकलेले पाऊल त्यासाठीच महत्त्वाचे आहे.

जंगले पर्यावरणाचे फुप्फुसे आहेत

संबंध जीवासाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा वायू आहे. तो सजीवाचा प्राण आहे. वनस्पती हा ऑक्सिजन निर्मितीचा मुख्य स्रोत आहे. म्हणजे जंगल हे ऑक्सिजन निर्मितीचे कारखाने आहेत. पण मानव विकासाकडे धावत असतांना या जंगलाचा विनाश करत आहे. म्हणजेच मानवाने पर्यावरणाच्या फुफ्फुसावर आघात केला आहे. त्यामुळे आज शुद्ध ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे.

‘इकोसिस्टीम’चा संकल्प करुया

सुमारे दीड वर्षापासून कोव्हीड- १९ चा विषाणू अफाट बुद्धिमान, हुशार आणि शक्तिशाली असलेल्या मानवाला अक्षरशः पराजित करतो आहे. कारण रात्रं दिवस बेभानपणे धावणाऱ्या मानवाला कोरोनाने स्तब्ध करून ठेवले आहे. या महामारीने समस्त जगासाठी एक स्पष्ट संदेश दिला आहे. तो मानवाने समजून घेऊन, आपल्या वृत्तीत आणि कृतीत सुधारणा करणे वर्तमानाची गरज व भविष्याची मागणी आहे. या निसर्गाची ‘इकोसिस्टीम’ पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा संकल्प गरजेचा आहे.

ऑक्सिजनचा मुख्य स्त्रोत वृक्ष. त्यामुळे प्रत्येकाने एक झाड लावले, तरी वर्तमानासह भविष्यात येणाऱ्या गंभीर संकटावर मात करणे शक्य होईल. यासाठी दूरदृष्टी, इच्छाशक्ती, निसर्ग प्रेम आणि सेवाभावी वृत्तीची आवश्यकता आहे. तरच हे पर्यावरणाचे फुफ्फुसे टिकून मानवाचे फुफ्फुसे कार्यरत राहतील.

- डॉ. ‌नागेश कराळे (पर्यावरण अभ्यासक)

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT