gondhali folk art should get govt help gondhali samaj demands nanded marathi news Sakal
नांदेड

Gondhali : नवीन पिढी दूर जातेय; गोंधळ लोककलेला मिळावा राजाश्रय, गोंधळी समाजाची मागणी

महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये कीर्तन आणि तमाशानंतर गोंधळ या लोककलेला विशेष महत्त्व

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये कीर्तन आणि तमाशानंतर गोंधळ या लोककलेला विशेष महत्त्व आहे. मात्र, शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या लोककलेला गोंधळी समाजाने आजही जिवंत ठेवले असून ते प्रबोधनाचे एक माध्यम बनले आहे. या कलेला राजाश्रय मिळावा, अशी मागणी गोंधळी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

शासनस्तरावरून व सामाजिक स्तरावरून महाराष्ट्रातील ही ऐतिहासिक व सांस्कृतिक लोककला जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे, असे गोंधळी विजय शिंदे, रामदास लोंढे यांनी सांगितले. गोंधळ हा कलाप्रकार प्राचीन काळापासून लोककलेमध्ये मोडला जातो.

महाराष्ट्रात तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवीचा गोंधळ घालण्याची परंपरा आहे. आजही बहुतांश समाजामध्ये शुभ काम, तसेच लग्न कार्यप्रसंगी गोंधळ व जागरण घालण्याची परंपरा आहे.

गोंधळी समाजाचे हे लोककलाकार आजही कलाविष्कार जोपासत आहेत. पूर्वी अंगात झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवीची प्रतिमा व कवड्याची माळ अशा वेशभूषेत हे गोंधळी आंबा मातेचा जयजयकार करत संबळ, डफ आणि तुणतुणे या पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने दारोदार फिरून ही लोककला सादर करायचे.

त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. कालांतराने या लोककलेचे महत्व कमी झाले किंवा अलीकडच्या काळामध्ये अनेक मनोरंजनाची संसाधने निर्माण झाल्याने ही लोककला लोप पावत असल्याचे दिसते. मात्र, आजही ग्रामीण भागामध्ये गोंधळी समाजाच्या वतीने ही लोककला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

नवीन पिढीला वाद्यांचा परिचय नाही

या लोककलेमध्ये वापरण्यात येणारी संबळ, तुणतुणे, सांज, डफ ही वाद्येसुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आजच्या नवीन पिढीला या वाद्यांचा परिचय सुद्धा उरला नाही.

देवीचा महिमा आणि लोकगीतातून आपली गुजराण करणाऱ्या गोंधळी गीतांचे व संबळ वादनाचे सार्वजनिक कार्यक्रम सरकारने हाती घ्यावेत. संबळाला प्रतिष्ठा मिळवून देताना राज्य म्हणून या वाद्याचे ब्रॅन्डिंग करावे.

— रामदास लोंढे, गोंधळी

या आहेत मागण्या

  • जातीच्या दाखल्यांसाठीची १९६१ पूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करावी

  • आरक्षणाचे प्रमाण वाढवावे

  • बार्टीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तसाठी स्वतंत्र संशोधन संस्था स्थापन करावी

  • असंघटीतासाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी

  • अंबाबाई, तुळजाभवानी, रेणुका देवी मंदिरात सरकार नियुक्त पुजारी म्हणून गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजातील व्यक्तीची नेमणूक व्हावी

  • कारागिर, लोककला, लोककलावंत संवर्धनासाठी संशोधन केंद्र निर्माण करावे

  • केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या दादा इदाते आयोग समितीच्या शिफारशी जशास तशा लागू कराव्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjangaon: खेलोबा देवस्थानाची जागा असल्याचे मान्य! शिवरायांच्या पुतळ्याबाबत अखेर तोडगा; राजन पाटलांची मध्यस्थी, एका रात्रीत काय घडलं?

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

SCROLL FOR NEXT