government support fARMER families of the suicide victims Marotrao Jagtap ardhapur
government support fARMER families of the suicide victims Marotrao Jagtap ardhapur sakal
नांदेड

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या पाठीशी प्रशासन

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील वारसांना मदत करणे, नाम फाउंडेशनचा एक चांगला उपक्रम आहे. प्रशासन शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आशा कुटुंबाच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी शुक्रवारी (ता ११) दिले. नाम फाउंडेशनच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील वारसांना मदतीचे धनादेश देण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील वारसांना नाम फाउंडेशनचा वतीने मदतीचे धनादेश वाटप करण्यात येत असून अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील वारसांना तहसील कार्यालयाच्या सभागृहात धनादेश देण्यात आले. या वेळी नामाचे जिल्हाध्यक्ष संपादक केशव घोणसे पाटील, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, डॉ. विशाल लंगडे, व्यंकटी राऊत, निळकंठ मदने, सखाराम क्षिरसागर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव काजी सल्लाउद्यीन यांची प्रमुख उपस्थिती होती.

नामचे तालुका समन्वयक लक्ष्मीकांत मुळे यांनी प्रास्ताविक करुन अर्धापूर तालुक्यात नाम फाउंडेशनचा वतीने करण्यात विविध कामांची व उपक्रमांची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष केशव घोणसे पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जिल्ह्यातील १२१ आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील वारसांना धनादेशाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीत खचून न जाता खंबीरपणे संकटांना सामोरे जावे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. ‘नाम’च्या वतीने प्रशासनाने मदतीसाठी पात्र ठरवून मदत केली आहे. अशा कुटुंबातील वारसांना धनादेशाचे वाटप करण्यात येत आहे. आशी माहिती केशव घोणसे पाटील यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गूणवंत विरकर, शंकर ढगे, गोविंद टेकाळे, छगन इंगळे, शेख साबेर यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नागोराव भांगे पाटील यांनी केले तर आभार रामराव भालेराव यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT