Mahakrushi Urja Abhiyan sakal
नांदेड

नांदेड : महाकृषी ऊर्जा अभियान: ३६०० शेतकरी झाले संपूर्ण थकबाकी मुक्त

१५३० शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कृषिपंपाचे वीज बिल आज भरू, उद्या भरू असे म्हणत महावितरणच्या कृषी वीज धोरणात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ दोन महिने उरले आहेत. येत्या ता. ३१ मार्चला ५० टक्के माफीची मुदत संपणार असून एप्रिलपासून बिलात फक्त ३० टक्के माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता अभियानात सहभागी होऊन आपल्या कृषिपंपाची थकबाकी तसेच चालू बिले भरून ५० टक्के माफी मिळवावी, असे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

कृषीपंप वीज जोडणी धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी जनजागृती केली जात आहे. गावागावात मेळावे घेऊन कृषीपंप वीज जोडणी धोरण प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. एक वर्ष निघून गेले असून, आता फक्त केवळ दोन महिने उरले आहेत. नांदेड परिमंडळात धोरणापूर्वी कृषीपंपाची थकबाकी चार हजार २०२ कोटींच्या घरात होती. दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून एक हजार ७११ कोटी माफ झाले आहेत. तर सुधारित थकबाकीतही ५० टक्के थकबाकी माफ होत असल्याने शेतकऱ्यांना ५० टक्के हिश्श्यापोटी एक हजार २४५ कोटी अधिक सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल ६०५ कोटी असे मिळून फक्त एक हजार ८५० कोटी भरायचे आहेत.

या देय रक्कमेपोटी आतापर्यंत ९३ कोटी ७४ लाखांचा भरणा वर्षभरात झालेला आहे. वसुलीचे हे प्रमाण केवळ ५.०६ टक्के इतकेच आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या तीन लाख पाच हजार ४५३ शेतकऱ्यांपैकी एक लाख ३३ हजार ८३ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला असला तरी केवळ तीन हजार सहाशे शेतकऱ्यांनीच योजनेचा संपूर्ण लाभ घेतला आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांनी फक्त कारवाई टाळण्यासाठी जुजबी रक्कम भरलेली आहे.

वसूल रक्कमेतील ३३ टक्के रक्कम गाव पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामांत वापरली जात असल्याने पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज समस्यांतून मुक्तता होत आहे. वसुलीमुळे उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून नांदेड परिमंडळात आतापर्यंत एक हजार ५३० कृषीपंप वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे. त्याबरोबरच उपकेंद्रांची क्षमतावाढही होणार आहे. तसेच नवीन रोहित्रे उभारण्यासह त्यांची क्षमतावाढही केली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी त्यांची बिले भरली तर अखंडित व पुरेशा दाबाने वीज देणे शक्य होईल. शिवाय नवीन शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडण्याही उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

Latest Maharashtra News Updates : राज्य मुक्त विद्यालयात नावनोंदणीची प्रक्रिया गुरुवारपासून होणार सुरू

SCROLL FOR NEXT