file photo 
नांदेड

अर्धापुरात महाविकास आघाडीचा बोलबाला, 16 पैकी 13 ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड; दहा ठिकाणी महिला उपसरपंच

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील दुस-या टप्प्यात झालेल्या सरपंच, उपसरपंचांच्या निवडणूकीत महाविकस आघाडीचा बोलबाला झाला असून 16 ग्रामपंचायतीपैकी 12 सरपंच, उपसरपंचांची निवड बिनविरोध झाली. लहान, निमगाव, पिंपळगाव, शैलगाव बुद्रूक येथे निवडणुक घेण्यात आली. तर पिंपळगावात उपसरपंचपदासाठी निवडणुक घेण्यात आली. यात काॅग्रेस व शिवसेनेचा उपसरपंच निवडूण आला आहे. लहानमध्ये इंगळे गटाची सरशी झाली आहे. तर बारसगाव ग्रामपंचायतीवर पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. विशेष म्हणजे आरक्षण नसतांनाही दहा ठिकाणी महिला उपसरपंच झाल्या आहेत.

अर्धापूर तालुक्यातील  ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदांची निवडणूक बुधवारी (ता. दहा) शांततेत पार पडली. काही गावात नाट्यमय राजकीय घडामोडीं झाल्या. तर काही ठिकाणी सरपंच पदाचा कार्यकाळ अडीच- अडीच वर्षे वाटून घेण्यात आले. तर तेरा गावातही निवड प्रक्रिया बिनविरोध पारपडली.

बारसगाव येथील ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे यांच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा सत्ता आली आहे. त्यांच्या गटाच्या मणिषा गजानन खंडागळे सरपंच झाल्या तर उपसरपंच सरिता बालाजी गोदरे झाल्या. लहान ग्रामपंचायत इंगळे गटाच्या ताब्यात गेली आहे. या गटाचे अमोल इंगळे सरपंच झाले तर उपसरपंचपदी शेख महेबूब यांची निवड झाली. लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीवर काॅग्रेसच्या विजय भुस्से यांच्याकडे सत्ता आली असून सरपंचपदी त्यांच्या पत्नी वैष्णवी भुस्से सरपंच झाल्या तर उपसरपंचपदी अरुणा भागवत शेंडगे यांची निवड झाली. पिंपळगावात सरपंचपदी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख संतोष कल्याणकर व काॅग्रेसचे सदाशीवराव देशमुख, अॅड. सुभाष कल्याणकर, वसंतराव कल्याणकर यांच्या गटाच्या लला कपील दुधमल यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदासाठी मतदान घेण्यात आले. यात उध्दव  कल्याणकर निवडूण आले.

कोंढा येथील ग्रामपंचायतीमध्ये काॅग्रेसचे पप्पु पाटील कोंढेकर यांच्या गटाची सत्ता आली आहे. त्यांच्या गटाच्या गोदावरी माधव पांचाळ सरपंच तर उपसरपंचपदी मिरा गंगाधर कदम यांची बिनविरोध निवड झाली. खैरगावात काॅग्रेसचे पंजाब चव्हाण यांच्या गटाला बहुमत आहे. त्यांच्या गटाच्या छायाबाई बालाजी लांडे सरपंचपदी तर उपसरपंचपदी व्यंकटी पवार यांची बिनविरोध निवड झाली. देळूब बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आझर पठान तर उपसरपंचपदी आम्रपाली लोणे यांची बिनविरोध निवड झाली.

पाटणूरच्या सरपंचपदी गंगासागर बाळू कोकाटे तर उपसरपंचपदी मिनाक्षी यशवंत शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. आमराबाद तांडा येथे अश्विन भवन पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. मेंढला खुर्द ग्रामपंचायतीमध्ये दत्ता पाटील नवले यांच्या गटाला बहुमत असून सरपंचपदी कुंताबाई उत्तमराव नवले तर उपसरपंचपदी कचराबाई प्रल्हाद नवले यांची बिनविरोध निवड झाली. बेलसर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रमेश भिमराव क्षिरसागर तर उपसरपंचपदी अनुसयाबाई चिमणाजी क्षिरसागर यांची बिनविरोध निवड झाली. शेणीच्या सरपंचपदी दादाराव शिंदे, संतोष धुमाळ, राजु धात्रक यांच्या गटाच्या प्रिया अनिल धुमाळ यांची सरपंचपदी तर राजु धात्रक उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. 

शैलगाव बुद्रूक येथे ज्ञानेश्वर राजेगोरे गटाच्या शांताबाई  देविदास राजेगोरे सरपंचपदी तर गोदावरी संजय राजेगोरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. निमगाव येथे संजय मोळके व साहेबराव झुडपे यांच्या गटाच्या आर्चना संजय मोळके सरपंचपदी तर उपसरपंचपदी अनिता वसंत चव्हाण यांची निवड झाली. सोनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ब्रह्मानंदाबाई दिलीप देबगुंडे यांची तर उपसरपंचपदी बालाजी कोरडे यांची बिनविरोध निवड झाली. मेंढला बुद्रूकच्या सरपंचपदी सरपंचपदी मंगल धर्माजी गजभारे तर उपसरपंचपदी मुक्ताबाई आनंदा यादव यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT