msedcl Power outage of agricultural pump Ardhapur farmers ptotest nanded
msedcl Power outage of agricultural pump Ardhapur farmers ptotest nanded sakal
नांदेड

अर्धापुरात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विराेधात पुकारला एल्गार

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : थकीत विज बिल वसुली साठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असून रब्बीच्या पिकांना पाण्याची गरज असताना सरसकट डीपी बंद करण्यात येत आहेत. याचा फटका नियमित वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. थकीत वीज बिल वसुलीसाठी तालुक्यातील शंभर डीपी बंद करून सुमारे एक हजार कृषी पंपाचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यात नियमित वीज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. या पध्दतीने वीज बिल वसुली विरुद्ध शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

लोण येथील शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालयाला शनिवारी (ता.पाच) घेराव घालून आपल्या व्यथा मांडल्या. तर शेतकऱ्यांचे उग्र रूप पाहून विज पुरवठा सुरळीत करण्याच्या लेखी आश्वासन दिल्यानंतरच कार्यालय सोडले. शेतकऱ्यांना असेच वेठीस धरले तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वसुली विरुद्ध लोणी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव घालून कूलुप ठोकले. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतरच कार्यालय सोडले.

शासनाच्या विज धोरण २०२० प्रमाणे विज बिल वसुली करण्यात येत आहे. तालुक्यात सात हजार ५०० कृषी जोडण्या असून सुमारे ५६ कोटी थकबाकी आणि या थकबाकीपैकी पावने तीन कोटी थकबाकी वसूल करण्यात आली आहे. तालुक्यात केवळ ३३० शेतकरी पुर्णपणे थकबाकी मूक्त आहेत. शासनाच्या योजनेचा लाभ घेवून नियमितपणे बील भरले तर ६५ टक्के वीज बिल माफ होवू शकते. ही योजना ३१ मार्च पर्यंत असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंता रामगिरवार यांनी केले.

माझे शेत अर्धापूर शिवारात असून तीन एकर टरबुज लावले आहे. मी नियमित वीज बिल भरतो. विज वितरण कंपनीने विज पुरवठा खंडित केला. त्यामुळे टरबुजाचे वेल वाळून जात आहेत. मी कंपनी कार्यालयात चकरा मारून थकीत झालो. माझे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार असून याला कंपनीच जबाबदार आहे.

- शंकर जाधव.

माझा सिमेंट पासून विविध बांधकाम साहित्य तयार करण्याचा कारखाना असुन वीस कामगार आहेत. मी नियमित वीज बिल भरतो. माझाही विज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. विज पूरवठा खंडित असल्याने कामगार बसून आहेत. याचा परिणाम उत्पादनावर होतो.

- फारुख अली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT