Nanded Agriculture Department Appeal aware purchasing fertilizers and seeds
Nanded Agriculture Department Appeal aware purchasing fertilizers and seeds sakal
नांदेड

नांदेड : खते, बी-बियाणे खरेदी करताना घ्यावी काळजी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शेतकऱ्यांची खरीप हंगाम पेरणीची कामे चालू असून खते, बि - बियाणे, किटकनाशके खरेदीची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, शेतकऱ्यांनी खरेदी करताना योग्य ती काळजी घेऊन अधिकृत कृषि केंद्र परवानाधारकांकडूनच खरेदी करावीत. कृषि सेवा केंद्रधारकांकडून बॅगवर नमुद केलेल्या एमआरपी किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्हा तक्रार निवारण कक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

बाजारपेठेत डीएपी खत मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडून एकाच कंपनीच्या किंवा ब्रँडच्या डीएपी खताची मागणी वाढलेली आहे. परंतू बाजारात उपलब्ध होणाऱ्या सर्व कंपन्यांच्या डीएपी खतामध्ये नत्र व स्फुरदचे प्रमाण सारख्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचा डीएपी खताची खरेदी करावी. एकाच कंपनीच्या डीएपी खताचा आग्रह धरु नये. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी करताना युरीया व सिंगल सुपर फॉस्पेट या खताचा वापर करावा. या खतामधून सोयाबीन पिकासाठी गंधक युक्त खते मिळतात. जे की सोयाबीन पिकांसाठी आवश्यक आहेत.

तसेच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना अधिकृत कृषि केंद्र परवानाधारकांकडूनच खरेदी करावी. खरेदीचे पक्के बिल पावती घ्यावी. पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठांचा संपूर्ण तपशिल असल्याची खात्री करावी. अनुदानीत रासायनिक खताची खरेदी करताना विक्रेत्यांकडून इ - पॉस मशीनवरील बिल घ्यावे. खरेदी केल्यानंतर बॅगवर नमूद असलेली किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासून घ्यावे. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग वेस्टन, पिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावे.

बियाण्याची पिशवी सीलबंद असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यांनी घरचे तसेच बाजारातील खरेदी केलेले बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करुनच बियाण्याची पेरणी करावी. सलग तीन दिवस शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यावर व जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा असल्यावरच सोयाबीन बियाण्याची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT