Nanded Ardhapur area Bananas crop demand
Nanded Ardhapur area Bananas crop demand 
नांदेड

नांदेड : केळीला मिळतोय प्रथमच विक्रमी भाव

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : येथील केळीच्या भावात यंदाच्या हंगामात विक्रमी तेजी आली असून उत्तर भारतातील बाजारात प्रतिक्विंटल ‌अडीच हजारांचा पल्ला गाठला आहे. सर्वसाधारण भाव दोन हजार ते एकवीसशे मिळत आहे. लागवडीपासूनच्या प्रथमच केळीला विक्रमी भाव मिळत आहे. ही तेजी आणखी काही दिवस राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे सतत पडणाऱ्या पावसामुळे बागांवर रोग पडण्याची भीती व्यक्त होत होती.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड, हदगावसह अन्य भागांत केळीचे लागवड क्षेत्र खूप मोठे आहे. गेल्या दोन वर्षांत केळीच्या बागांवर करपा रोग आल्याने उत्पन्न तर सोडाच लागवडी खर्चही निघाला नव्हता. तरीही शेतकऱ्यांनी यंदा लागवड करून केळीच्या बागा जपल्या होत्या. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच भावात तेजी होती, ती कायमच आहे. यंदा मागणी जास्त आहे तर उत्पादन कमी आहे. काही भागांत नैसर्गिक आपत्तीमुळे केळीचे उत्पादन कमी झाले आहे. दोन‌ वर्षांत उत्पन्न घटल्याने केळीच्या लागवडी क्षेत्रात घट झाली होती. याचा परिणाम उत्पादनावर झाला. परिणामी यंदा प्रथमच विक्रमी भाव मिळत आहे.

असा मिळत गेला भाव

केळी कापणीचा हंगाम मे, जून महिन्यात सुरू झाला. मे महिन्यात एक हजार सहाशे ते एक हजार सातशे, जूनमध्ये एक हजार आठशे ते दोन हजार, जुलैत दोन हजार ते अडीच हजार भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेत दोन हजार ते एकवीसशे भाव मिळत असून केळी उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

रोगाचे संकट टळावे…

गेल्या पंधरा दिवसांपासून शहरासह तालुक्यात संततधार पाऊस सुरूच आहे. सततच्या पावसामुळे केळीवर करपा, लाल डाग पडणे, घडावर ठिपके पडणे आदींची शक्यता असते. हे संकट टळले तर यंदा चार पैसे जास्त मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत.

यंदाच्या कापणी हंगाम सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत केळीच्या भावात विक्रमी तेजी आहे. बाजारात आवक कमी व मागणी जास्त असल्याने उत्तर भारतातील बाजारपेठेत दोन हजार ते अडीच हजारपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेत दोन हजार ते एकवीसशे भाव मिळत आहे. आगामी सण, उत्सवाच्या काळात भावात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

- नीलेश देशमुख, केळीचे व्यापारी

यंदाच्या हंगामात केळीला चांगला भाव मिळाला आहे. येणाऱ्या काळात भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बाग स्वच्छ ठेवणे, बागेची स्थिती पाहून योग्य वेळी फवारणी करणे आवश्यक आहे.

- आर.आर. देशमुख, केळी उत्पादक शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT