विद्या व सृष्टी भुसेवार
विद्या व सृष्टी भुसेवार  sakal
नांदेड

Nanded : दोघी सख्या बहिणी झाल्या डॉक्टर ; आई - वडिलांचे स्वप्न केले साकार

सकाळ वृत्तसेवा

नायगाव : तालुक्यातील हिप्परगा (जा.) येथील सहशिक्षक असलेले मोहन भुसावार यांच्या दोन मुलींची प्रेरणादायी कहाणी असून त्यांनी अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर एकाच वेळी एमबीबीएस उतीर्ण होवून वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आहे. ग्रामीण भागात असतानाही दोन मुलींचे एकाच वेळी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील असलेले मोहनराव भुसेवार यांनी अथक परिश्रम करुन शिक्षक झाले. त्यांनी केलेल्या कष्टाची कहाणी विद्या व सृष्टी भुसेवार दोन्ही मुलींनी ऐकली आणि पाहिली. त्यामुळे त्यांनी देखील कुठल्याही परिस्थितीत शिक्षणात मागे राहायचे नाही ही मनाशी खुणगाठ बांधून अभ्यास करण्यास सुरुवात केली. दोघी जुळ्या बहिणी नसल्या तरी शाळेत जाताना एक दुसऱ्याला मदत व्हावी, यासाठी दोघांना एकदाच आणि एकच वर्गात प्रवेश देण्यात आला.

दोघीही बहिणी कुशाग्र बुध्दीच्या असल्याने त्यांनी येथील ब्ल्यू बेल्स इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या यशाचा आलेख उंचावला. नांदेडला माध्यमिक शिक्षण ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलमध्ये येथे पूर्ण झाले. दहावीनंतर दोघांनाही डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे त्या दहावीपासूनच तयारीला लागल्या होत्या. २०१७-१८ मध्ये विद्या व सृष्टी यांनी निट परिक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यात यशस्वी झाले. त्यामुळे दोघांचेही डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार झाले.

विद्याचा नंबर एमआयटी वैद्यकिय कॉलेज लातूर येथे तर सृष्टीचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालय अंबेजोगाई येथे एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला. तेथेही त्यांनी मोठ्या जिद्दीने अभ्यास करुन एमबीबीएसची पदवी मिळवली असून महाविद्यालयाच्या वतीने दोघींचाही सत्कार करुन पदवी बहाल करण्यात आली.

कष्ट, जिद्दीने स्वप्न साकार

विद्या व सृष्टीने अत्यंत कष्टाने व जिद्दीने आई वडीलांचे स्वप्न साकार केले. मूळगाव हिप्परगा (जा.) येथून त्या पहिल्या डॉक्टर आहेत. तर वडीलांची कर्मभूमी कुंटूर येथे एकाच घरातील दोन बहिणी डॉक्टर होण्याचा मान जातो. या यशात गुरुजनांबरोबरच आईचा मोठा वाटा आहे. नोकरी करता करता मुलींचा अभ्यास घेणे ही तिची दुहेरी भुमिका होती. एमबीबीएस झाल्यानंतर त्यांना आता एमडी करायचे असून त्यातही यशस्वी होऊ, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT