file photo
file photo 
नांदेड

नांदेड : देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बाबा फतेहसिंघजी बहूद्येशीय संघटनेचे धरणे

प्रल्हाद कांबळे

नांदेड -  केंद्र सरकारने शेतकरी विरोधातील कृषी विधेयके पास केली आहेत. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा म्हणून बाबा फत्तेसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष मनबिरसिंघ ग्रंथी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र रणे आंदोलन करण्यात आले.

केंद्रातील मोदी सरकारने राक्षसी बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधी तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे भविष्यकाळात मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भाजपाने मंजूर केलेल्या  कृषि विधेयका विरोधात दिल्ली येथे देशव्यापी जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे. या देशव्यापी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबा फतेहसिंघजी संस्थेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनात बाबा फत्तेसिंगजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हजुरी साथ-संगत तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र धरणे आंदोलन केले. यावेळी मनबीरसिंघ ग्रंथी यांनी शेतकरीविरोधी कृषी विधेयकांचा जाहीर निषेध करीत देशव्यापी आंदोलनास सक्रीय पाठिंबा जाहीर करून केंद्र सरकारचा निषेध केला.

 शेतकरीविरोधी कृषि विधेयकांच्या निषेधार्थतील  देशव्यापी आदोलनाच्या समर्थनार्थ धरणे आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.  या धरणे आंदोलनास राज्य सरपंच संघटना व दशमेश चॅरीटेबल ट्रस्टने पाठींबा जाहीर केला. यावेळी बाबा फत्तेसिंगजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मनबीरसिंघ ग्रंथी, नौनिहालसिंघ जहागीरदार, गुरमितसिंघ बेदी, सुरजितसिंघ भवानीवाले, राजसिंघ रामगडिया, नरेंद्रसिंघ धारिवाल, हरजिंदरसिंघ कामठेकर, बंदीछोडसिंघ खालसा, रघुवीरसिंघ बुंगई, श्रीधर नागापूरकर, गुपिसिंघ कुल्फीवाले, गुरुप्रीतसिंघ ग्रंथी, जसबिरसिंघ हुंदल, नवज्योतसिंघ जहागीरदार, हरभजनसिंघ दिगवा, जोगिंदरसिंघ सरदार, बलवंतसिंघ कालो, लक्कीसिंघ कोटीतिर्थवाले, संदिपसिंघ जोहर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT