Farmer cleaned canal struggle to prevent damage to agriculture sakal
नांदेड

शेतकऱ्याने केली श्रमदानातून कॅनालची साफसफाई

लिंगापुर शिवारात उपक्रम; ज्ञानेश्वर देवसरकर यांची शेतीचे नुकसान टाळण्यासाठी धडपड

शशीकांत धानोरकर

तामसा : शेतातून जाणाऱ्या कॅनालच्या पुलाच्या पाईपमध्ये अडकलेल्या झाडे - झुडपांचा शेतीला होणारा धोका टाळण्यासाठी लिंगापुर (ता. हदगाव) शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर नागेंद्रराव देवसरकर यांनी स्वतः श्रमदान करीत झाडे-झुडपे, केरकचरा जाळून टाकत पाण्याला वाट मोकळी करून देत शेती वाचविण्याची धडपड चालविली आहे.

शेतकरी देवसरकर यांनी सतत आठ दिवस स्वतःच्या शेतातून जाणाऱ्या पाचशे मीटर लांबीच्या कॅनालमधील झाडे-झुडपे तोडणे व केरकचरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. इसापूर धरणाचे सदरील कॅनाल असून लिंगापुर शिवारातून हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी शिवारापर्यंत वाहते. देवसरकर यांच्या शेतातील कॅनलचा बराचसा भाग उंचवट्यावर असल्याने पुलाच्या मागील भागात उन्हाळ्यात सोडण्यात येणारे पाणी व पावसाचे वाहते पाणी मोठ्या प्रमाणात अडते. परिणामी पुलाचे पाईप झुडपे व केरकचऱ्यामुळे तुंबून साठलेल्या पाण्यामुळे कॅनालचा भाग फुटण्याची भीती देवसरकर यांना भेडसावत असते. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याचा धोका असतो.

वास्तविक पाहता कॅनालची साफसफाई संबंधित विभागाची असते. पण देवसरकर यांनी संबंधितांकडे याबाबत कार्यवाहीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळवण्याची कमी शक्यता लक्षात घेऊन स्वतः शेती वाचण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा चालविली आहे. स्वतःच्या शेतातील कॅनालमधील केरकचरा गोळा करून धोकादायक अवस्थेतील वाढलेली झाडे तोडली. संकलित केरकचरा, झाडेझुडपे जाळून टाकण्यात आली. यामुळे कॅनालच्या पुलाजवळ पावसाचे पाणी साठवून शेतीचा संभाव्य धोका तात्पुरत्या स्वरूपात टळला आहे.

शेतातून कॅनाल जाण्यामुळे शेतीला फायदा होईल असे वाटले. पण पुलाजवळचा उंच भाग व अडणारी झाडे झुडपे, केरकचरा यामुळे कॅनाल डोकेदुखी बनला आहे. निसर्गाचा वाईट अनुभव शेती व शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजला आहे. आपली शेती आपणच वाचवली पाहिजे, याच हेतूने श्रमदान केले आहे.

- ज्ञानेश्वर देवसरकर, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 4th T20I : शुभमन गिल खेळणार नाही, मैदानातही पोहचला नाही; मोठं कारण आलं समोर

SHANTI Bill: अणुऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा! शांती विधेयक लोकसभेत मंजूर; का ठरणार गेमचेंजर?

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी पाच याचिकांच्या संदर्भात अपात्रता याचिका फेटाळून लावली

SCROLL FOR NEXT