Jal Jeevan water supply scheme
Jal Jeevan water supply scheme esakal
नांदेड

Nanded : जलजीवन मिशनच्या ७६ गावांत योजना मंजूर; पण तीनच कामे सुरू

सकाळ वृत्तसेवा

नायगाव : जलजीवन मिशन योजनेंतर्गत नायगाव तालुक्यात ७६ गावात पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मात्र केवळ तीन गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाल्याने जिल्हा परिषद झारीतील शुक्राचार्य बनत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे विशिष्ट कंत्राटदारांच्या घशातच या योजना घालण्याचा खटाटोप चालू असल्याचीही चर्चा होत आहे.

नायगाव तालुक्यातील ७६ गावामध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. या योजना मंजूर झाल्यानंतर कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्तरावरुन अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय तांत्रिक मान्यता आणि त्यानंतर निवीदा व कार्यारंभ आदेश मिळणे आवश्यक असते. परंतु मागील अनेक महिण्यापासून पाणी पुरवठा योजना निविदा स्तरावर आल्याच नाहीत. तालुक्यातील ७६ पैकी केवळ तीन गावच्या योजनेचे काम सुरु झाले आहे.

तांत्रिक, प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येते पण तालुक्यातील पिंपळगाव येथील १ कोटी ९२ लाख, शेळगाव गौरी येथील २ कोटी आणि ताकबिड येथील १ कोटी ५५ लाख खर्चाच्या तीनच योजनेचे काम सुरु आहे. तर ७३ योजना अद्यापही कागदावरच राहीलेल्या आहेत.

काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून काही कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असले तरी आक्टोबर २०२२ पर्यंत तालुक्यातील संपूर्ण कामाचे वर्क आर्डर मिळून जातील असे नियोजन चालू आहे.

- सुधीर सरनाईक, उप अभियंता, नायगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT