file photo
file photo 
नांदेड

नांदेड : वाई बाजारच्या वॉटर फिल्टर प्लांट मालकांना माहूर नगरपंचायतची नोटीस- पंचायत समिती स्तरावरुनही कारवाई

साजीद खान

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : माहूर नगरपंचायत प्रशासनाने शहरातील सर्व वाटर फिल्टर प्लांट धारकांना भूजलसह इतर परवानग्या संदर्भात नोटीस तामील करून वाटर प्लांट सील करण्याची कारवाई केली. सोबतच माहूर शहरात वाई बाजार येथून शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने वाई बाजार येथील वाटर फिल्टर प्लांट मालकांना नोटीस तामिल करून सक्षम प्राधिकरणाच्या परवानग्या संदर्भात खुलासा मागविण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या हरित लवादाने (ता. १९) जून २०२० रोजी पारित केलेल्या आदेशानुसार पिण्याचे पाणी शुद्ध करून विकणाऱ्या पाणी प्लांट धारकास सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.परंतु माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याचे उत्तम स्त्रोत उपलब्ध असलेल्या ठिकाणी भरभराटीचा व्यवसाय म्हणून सुरू करण्यात आलेल्या पाणी फिल्टर प्लांट मालकांनी कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता मन मर्जीने साधे,थंड पाण्याचे बॅरल व पाणी पाऊच विक्रीचा धंदा सुरू केला आहे.वास्तविक पाहता त्यांना केंद्र शासनाचे भूजल सर्वेक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळ इत्यादींची परवानगी घेणे आवश्यक होते. कुठल्याही ना हरकत प्रमाणपत्र ची पूर्तता केल्या शिवाय माहूर शहरासह वाई बाजार परिसरात खाजगी वाटर फिल्टर प्लांट बिनदिक्कतपणे चालविले जात होते.

माहूर शहरात पाण्याचे स्त्रोत नसल्याने वाई बाजार व परिसरातील वाटर फिल्टर प्लांटचे पाणी माहूर शहरात विक्री केले जात होते. त्या अनुषंगाने माहूर शहरातील वाटर प्लांट ला सील ठोकण्यात आले. व वाई बाजार येथील वाटर फिल्टर प्लांट मालकांना नोटीस पाठवून सक्षम प्राधिकरणाचे परवानगी तात्काळ प्राप्त करून घ्यावी अन्यथा नगरपंचायत माहूर कडून प्लांट सील करण्यात येईल अशी नोटीस मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर यांनी पाठविली आहे. हरित लवादाच्या आदेशानुसार नगरपंचायत व पंचायत समिती स्तरावरून वाटर फिल्टर प्लांट मालकांना नोटिसा पाठवणे व सील लावण्याचे कारवाया केले जात असताना मात्र तहसील विभागाने या गंभीर प्रकरणी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

माहूर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील वाटर फिल्टर प्लांट मालकांना ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांच्या माध्यमातून नोटिसा बजावण्यात आल्या असून आज संध्याकाळी उशिरापर्यंत किंवा उद्यापासून सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसलेले संपूर्ण वाटर फिल्टर प्लांटला ताळे ठोकण्यात येणार आहे.

- युवराज मेहेत्रे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, माहूर.

संपादन - प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT