Nanded Malegaon fight in two groups
Nanded Malegaon fight in two groups 
नांदेड

नांदेड : मालेगावात क्षुल्लक कारणांवरून दोन गटांत राडा

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : मालेगाव (ता.अर्धापूर) येथे दोन गटात राडा झाला असून दोन्ही गटातील साठ ते सत्तर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका गटा विरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटाविरूद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आला आहे. मालेगावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ मालेगावात बंद पाळण्यात आला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर दोन पोलिस जखमी झाले आहेत.

या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मालेगावात दोन गटात क्षुल्लक कारणांवरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास झाली. घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केल्याप्रकरणी कूंटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २६ आरोपीससह इतर २० ते २५ (सर्व रा.देगाव कुराडा) जणांवर गून्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर दुसरीकडे पोलिस समजून सांगत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, पोलिसांवर दगडफेक करून जखमी केले. तसेच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बळीराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख, पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी भेट देऊन लोकांना शांततेचं आवाहन करण्यात आले आहे. मालेगावत शांतता असून पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील या करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT