Nanded Marathwada development works Ashok Chavan
Nanded Marathwada development works Ashok Chavan 
नांदेड

Nanded : अमृतमहोत्सवी वर्षात‌ मराठवाड्याला न्याय द्यावा; अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात शासनाने मराठवाड्यातील विकास कामांना जी स्थगिती दिली ती उठून विकास कामांना गती देण्यात यावी व मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यात यावा. या भागातील विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता.२६) भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात वार्षिक सर्वसाधारण सेभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करतांना अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, भाऊरावने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. कारखाना क्षेत्रात दोन महिन्यांतच ऊस लागवडीचे काम पूर्ण होत असल्याने ऊस तोडीचे नियोजन बिघडत आहे.

ऊसची लागवड नियोजनबद्ध झाली पाहिजे. येणाऱ्या काळात साखरे सोबत निर्मितीडे लक्ष दिले जाईल. भाऊरावने शेतकऱ्यांचे देणे नेहमीच अग्रक्रमाने चुकते केले आहे. येणाऱ्या काळात एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल असे आश्वासन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक यांनी दिले.

ही वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला आमदार अमर राजूरकर, नरेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपाध्यक्ष प्रा. कैलास दाड, पप्पु पाटील कोंढेकर, बालाजी गव्हाणे, बाळासाहेब देशमुख, दिलीपराव देशमुख, श्यामराव पाटील टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे कारखाना प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.

तर कारखान्याचे कार्यकारी संचालक‌ श्याम पाटील, संचालक प्रवीण देशमुख, अॅड. सुभाषराव कल्याणकर, व्यंकटराव कल्पनाकर, शिवाजी पवार, किशनराव पाटील, मोतीराम जगताप, सुभाषराव देशमुख, उत्तमराव राठोड, रंगराव पाटील, आनंदराव सावते, दत्ता सूर्यवंशी, किशनराव पाटील, बालाजी शिंदे, माधवराव शिंदे, दत्ताराम आवातिरक, अशोक कदम, भिमराव कल्याने, श्यामराव पाटील यांनी ठरावाचे वाचून करून अनुमोदन दिले.

या सभेचे सूत्रसंचालन शिवाजीराव धर्माधिकारी यांनी आभार व्यंकटराव कल्पनाकर यांनी मानले. या सभेला माजी सभापती आनंदराव कपाटे, अमोल डोंगरे, भगवान तिडके, दिगांबर तिडके, ज्ञानेश्वर राजेगोरे, नवनाथ कपाटे, चंद्रमुणी लोणे, प्रल्हाद सोळंके, राजू शेटे, व्यंकटी राऊत, बाळू माटे, व्यंकटराव साखरे, पंडित शेटे, दत्ता नादरे यांच्यासह शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT