MLA Jawalgaonkar
MLA Jawalgaonkar 
नांदेड

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बैठक

सकाळ वृत्तसेवा

हदगाव : हदगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतील या अनुषंगाने आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी रणशिंग फुकले असून त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी तालुक्यातील पदाधिकारी, पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी संचालक, नगरसेवक, माजी नगरसेवक, युवक काँग्रेस कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहणार असून या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आमदार जवळगावकर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून एक प्रकारे वातावरण निर्मितीची सुरुवात झाली असल्याचे बघावयास मिळत आहे.

मागील अनेक काही वर्षापासून आमदार जवळगावकर यांच्या नेतृत्वालाखाली हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला अच्छे दिन बघावयास मिळत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली दोन वेळा नगरपरिषद ताब्यात आली तर मतदारसंघात बहुतांश जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे निवडून आले. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहातही काँग्रेसचे संचालक मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. त्याचबरोबर मतदारसंघातल्या बहुतांश ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सूचनेनुसार काँग्रेस कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या बैठकीचे आयोजन केले असून पालिका निवडणुकीत इच्छुक असलेले उमेदवारी मोठ्या प्रमाणात येणार आहेत.

आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष नगर नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता आली. या दहा वर्षाच्या कार्यकाळात आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मोठी महत्त्वकांक्षी कामे केली असून शहरात मोठी विकास कामे केली आहेत. दलित वस्तीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे चौक, नागसेन नगर, नवी व जुनी आबादी या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा निधी टाकून गल्लीबोळात रस्ते नाल्या करून त्या भागाचा विकास केला.

इच्छुकांनी केली पक्षाकडे नोंद

पालिका निवडणुकीकरता शहरातील २० वार्डासाठी इच्छुकांचे काँग्रेस पक्षाकडून अर्ज मागविण्यात आले होते. (ता.सात) जुलै ही शेवटची तारीख असली तरीही मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी काँग्रेस पक्षाकडे नोंद केली असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT