नांदेड

Nanded : अतिक्रमण काढण्याच्या प्रशासनातर्फे हालचाली

सकाळ वृत्तसेवा

हिमायतनगरातील चौपाटीचे प्रकरण डाक अधीक्षकांचे तालुका दंडाधिकाऱ्यांना पत्र

हिमायतनगर : शहरातील चौपाटी भागातील भारतीय डाक विभाग केंद्र सरकारच्या मालकी हक्क असलेल्या वार्ड क्रमांक सहामधील घर क्रमांक सातवरील क्षेत्रफळ १८ हजार स्केअर फुट जागेवर ११ व्यक्तीने अनधिकृत अतिक्रमण केले आहे. सदरचे अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी भारतीय डाक विभागाचे जिल्हा अधिक्षक राजीव व्ही. पाळेकर यांनी केली आहे.

तालुकादंडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात डाक अधिक्षक यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर शहरातील भारतीय डाक विभाग पोस्ट ऑफिसच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सबंधित दुकानदारांना पत्रव्यवहार, नोटीसी दिल्या आहेत. परंतू संबंधितानी अतिक्रमण काढले नाही.

शहरातील शेख अजीम शेख अहमद, सय्यद सादिक सय्यद अली, अब्दुल हाफिज अब्दुल अजीज, अलीम हबीब, मेहमूद खान दावूद खान, तुलसीराम कोंडीबा, हर्षद हबीब, इसा बेग अब्बास बेग, मुजाहीद बेग मुसा बेग, मसूद खान अजगर खान यांच्यासह शेख सिराज शेख मैनुद्दीन आदी अतिक्रमणधारकांनी कायम दुर्लक्ष केले आहे.

पोष्ट शासकीय कार्यालयात अनेक योजनेची माहिती देण्यासाठी व तसेच ज्येष्ठ नागरिकांना पोस्ट योजनेची माहिती देण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर जागा कमी पडत आहे, असे नांदेड अधिक्षक राजीव पाळेकर व भोकर उपविभागीय डाक निरीक्षक वाय. एच. काटोले यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर हिमायतनगर शहरातील पोस्ट ऑफिसच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मागणी येथील तालुका दंडाधिकारी यांच्यासह पोलीस निरीक्षक बी. डी. भूसनूर, हिमायतनगर नगर पंचायतचे मुख्याधिकारी, भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक, भोकरचे प्रांताधिकारी यांनाही लेखी निवेदन दिले आहे.

अनेकांनी या पोष्ट ऑफीसच्या जागेवर दोन अनधिकृत हॉटेल, पानटपरीचे टिन शेड, हॉटेल व काहींनी तर पक्के घरे बांधली आहेत. सदर जागा तत्काळ खाली करण्यासाठीच्या सूचना ता. ३० ऑक्टोंबरपर्यंत करण्यात आल्या आहेत. अन्यथा ता. ३१ ऑक्टोंबर रोजी भारतीय डाक विभाग पोलीस प्रशासनास मदतीला घेऊन अतिक्रमण काढणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT