Nanded MSRTC Pandharpur 250 bus for Ashadhi wari
Nanded MSRTC Pandharpur 250 bus for Ashadhi wari sakal
नांदेड

नांदेड : आषाढीसाठी अडीचशे बस धावणार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या नांदेड विभागीय कार्यालयाने ता. सहा ते ता. १४ जुलै या कालावधीत २५० बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाळवे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग त्याचबरोबर कर्मचारी संपामुळे एसटी बस संकटात सापडली होती. मात्र, आता जवळपास सर्व सुरळीत झाले आहे. त्यामुळे यंदा पंढरपुरला आषाढी एकादशी सोहळाही मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. त्यासाठी आळंदी, देहूसह राज्याच्या विविध भागांतून पायी दिंड्या निघालेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नांदेड विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाळवे यांनी २५० बसेस ता. सहा ते ता. १४ जुलै या कालावधीत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

आगार परिसरातील गावातून थेट पंढरपूर येथे जाण्यासाठी व परत येण्यासाठी ४० ते ४५ प्रवाशांचा ग्रुप उपलब्ध झाल्यास गावातून थेट जादा गाडीही सोडण्याचे नियोजन केल्याचे श्री. वाळवे यांनी पत्रकात म्हटले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे वारकऱ्यांना वारीला जाता आले आहे. यंदाच्या वर्षी वारीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भाविकांची गर्दीही वाढली असून त्या दृष्टीने एस टी महामंडळाच्या वतीनेही आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आगारनिहाय बस

नांदेड ः ५० भोकर ः २६ किनवट ः १६ मुखेड ः ३६

देगलूर ः ३१ कंधार ः ३६ हदगाव ः २१ बिलोली ः २६

माहूर ः आठ एकूण ः २५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT