file photo
file photo 
नांदेड

नांदेड महापालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाइन मंजूर 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मंजुरीनंतर साडेचार महिने स्थायी समितीकडे राहिलेला अर्थसंकल्प गुरुवारी (ता. १६) झालेल्या तहकुबीच्या विशेष अर्थसंकल्पीय ऑनलाइन सभेत दुरुस्ती व सुधारणांसह मंजूर करण्यात आला. तंत्रज्ञांची साधने उपलब्ध असतानाही ही सभा नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली नव्हती. स्थायी समिती सभागृहातून झालेल्या सभेच्या कामकाजाच्या वेळी महापौर दीक्षा धबाले, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह महापालिकेचे काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपमहापौर सतीश देशमुख परुळेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी ते करत असल्याने त्यांनी घरूनच ऑनलाइन उपस्थिती लावून आपले मनोगत व्यक्त केले अन्य सदस्य देखील ऑनलाईन उपस्थित होते.

ता. 13 जुलैला झालेल्या सभेत काही नगरसेवक प्रतिनिधी उपस्थित लावल्याची वाचता झाल्यानंतर तो प्रकार टाळण्यासाठी आयुक्तांनी मात्र वेळेप्रमाणे ऑनलाइन उपस्थिती न लावता सभागृहात उपस्थिती लावली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही सभा अडीच तास चालली. सभेदरम्यान नेटवर्क कनेक्टिविटीचा अडथळा येत होता. तेव्हा सभा कामकाजाचे इतिवृत्त लिहिणाऱ्या व्यक्तींकडून मोबाइलवर संपर्क साधून त्यांची मनोगत तेथून घेतले. शासनाने ता. 13 मार्च रोजी कोविड योजनेसाठी अधिसूचना काढून काही बंधने आणली होती. त्यापूर्वीच आयुक्तांनी सादर केलेला अर्थसंकल्प ता. 17 मार्चच्या सभेत स्थायी समितीने मंजूर केला. तेव्हाच बंधने येण्याची शक्यता लक्षात घेता ता. 22 मार्चच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी विशेष सभा घेऊन अर्थसंकल्प सादर करता आला असता पण सभापतींनी तसे पत्र त्यावेळी महापौरांना दिले नसल्याने मंजूर झालेला अर्थसंकल्प नगरसचिव यांच्या कार्यालयातच पडून होता.

सभेत दोन मिनिटात भाषण संपविण्याचे बंधन सदस्यावर आणले होते

अर्थसंकल्प त्याचवेळी सभेत सादर झाला असता तर लाॅकडाऊनच्या चार महिन्याच्या कालावधीत नगरसेवकांना त्यावर अभ्यास करायला वेळ मिळाला असता. पण असे झाले नाही. शेवटी शासन पत्रानंतर गेल्या ता. 13 जुलै रोजी अर्थसंकल्पाची सभा ऑनलाइन घेण्यात आली सभा सुरू होण्यापूर्वी कुठलाही कर नसलेला ८८३ कोटीचा अर्थसंकल्प सर्व सदस्यांना घरी पाठविण्यात आला होता. स्थायी समिती सभागृहात तो सभेसमोर ऑफलाइन सादर करण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. सदस्यांना अभ्यासासाठी केवळ तीन दिवसांचा वेळ दिल्यानंतर तर खूप केलेली ती सभा पुन्हा ऑनलाईन घेण्यात आली. महापौर व उपमहापौर यांच्या कालावधीतील ही शेवटची सभा ठरली आहे. या सभेत दोन मिनिटात भाषण संपविण्याचे बंधन सदस्यावर आणले होते. त्यावरचा आक्षेपही निरर्थक ठरला. चौकट जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला सभागृहाचा विसर मागील दीड दशकात महापालिकेच्या जवळपास सर्वच सभा शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात किंवा मनपा इमारतीतील चौथ्या मजल्यावरील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात झाले आहेत.

शंकररावजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा विसर

 ता. 13 जुलै रोजी शंकररावजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेली सभा मात्र या दोन्हीपैकी एका सभागृहात न घेता मनपाच्या इमारतीत असलेल्या स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. तर खूप सभा देखील पुन्हा त्याच ठिकाणी घेण्यात आल्या. ज्येष्ठ नेते व नांदेडचे पहिले नगराध्यक्ष शंकराव चव्हाण यांच्या नावाने असलेल्या सभागृहात तांत्रिक सुविधा नसल्या तर उपलब्ध करता आल्या असत्या. पण शताब्दी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या बैठकीत यांचे औचित्य पाळले गेले नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. ऑनलाइन सभा घेण्याची तरतूद कायद्यात नाही शासनाने   मनपास दिलेल्या त्या सूचना आहेत. अशा परिस्थितीत मनपा मालकीची 900 च्या आसपास क्षमता असलेल्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ही सभा शारीरिक अंतर राखून पार पाडणे सहज शक्य होते. यानिमित्त शंकररावजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे योग्य सादरीकरणे करता आले असते पण कोणालाही याबाबत कसे सुचले नाही याचे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT