Nanded prahar organization agitation
Nanded prahar organization agitation sakal
नांदेड

नांदेड : प्रहारच्या आंदोलनाची पालकमंत्र्यांकडून दखल

सकाळ वृत्तसेवा

माळाकोळी : प्रशासकीय चुकीमुळे व ऊकरून ठेवलेला वागदरवाडी रस्ता ज्यामुळे येथील नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली होती यासह माळाकोळी ते कंधार रस्ता कामासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तालुकाप्रमुख माउली गीते यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दखल घेऊन संबंधित शिष्टमंडळाशी चर्चा केली व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

माळाकोळी -वागदरवाडी - मजरेसांगवी ते दगडसांगवी रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे दाखवून रस्ता मागील आठ महिन्यांपासून ऊकरून ठेवला होता मात्र सदर काम मंजूर नसून नागदरवाडी पवार तांडा मार्गे काम मंजूर असल्याचे नंतर लक्षात आले त्यानंतर वागदरवाडी रस्ता आहे त्या स्थितीत सोडून देण्यात आला.

यामुळे या रस्त्यावर अपघात होऊन गंभीर जखमी होण्याचे प्रमाण वाढले होते. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख माऊली गीते, दिव्यांग जिल्हा संघटक चांद पाशा शेख, कार्यकारी अभियंता.श्री धोंडगे, गोकुळ केंद्रे, माजी सरपंच परमेश्वर केंद्रे, प्रभू केंद्रे, सरपंच नाथराव केंद्र, माजी सरपंच माधवराव केंद्रे, राम केंद्रे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी वागदरवाडी रस्त्याच्या संदर्भाने ‘सकाळ’ने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या व्रतांच्या संदर्भाने आभार मानले.

प्रशासकीय चुकीमुळे वागदरवाडी मजरे सांगवी चोंडी येथील ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले, मात्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याच्या इशाऱ्यामुळे पालकमंत्र्यांनी दखल घेतली. यामुळे सदर विषय मार्गी लागला आहे.

- माऊली गिते, प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाप्रमुख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT