Nanded News
Nanded News 
नांदेड

नांदेड - तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष बांधणार -राहुल प्रधान

शिवचरण वावळे

नांदेड - वडीलांकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले असून त्यांचा हा वारसा पुढे घेऊन जाण्याचा आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केला. अतिशय सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी स्वःता गुन्हेगार ठरलो. या पुढे देखील तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र प्रदेश समिती स्थापन करुन पुढे आजाद समाज पार्टीची बांधणी करणार असल्याचे राहुल प्रधान यांनी सांगितले. 

आजाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी रविवारी (ता. तीन) मुंबई येथे राहुल प्रधान यांची आजाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. त्यानंतर सोमवारी (ता. चार) राहुल प्रधान यांनी नांदेडला पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पुढे माहिती देताना राहुल प्रधान म्हणाले की, अनेक तरुण राजकारणात येण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र प्रत्येक वेळी त्यांना राजकारणातुन डावलले जाते. अनेक तरुण नाऊमेद होतात.

भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातुन समाजकार्य करणार 

अशा नाऊमेद आणि डावलल्या गेलेल्या सर्व तरुणाईला सोबत घेऊन राजकारणात खांद्याला खांदा लावून त्यांना सोबत घेऊन काम करण्यावर अधिक भर देणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश समिती गठीत करणार असून, गाव तिथे आजाद समाज पार्टीची शाखा स्थापन करणार आहे. 
चंद्रशेखर आजाद यांची भीम आर्मी ही सामाजिक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातुन देखील समाजकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मोक्का लावण्याचा प्रकार झाला 

भारतीय जनता पक्षाच्या काळात अनेक लहान, मोठे कार्यकर्ते, लेखक, पत्रकार, कलावंतांची मुस्कटदाबी केली. भारतीय जनता पार्टीच्या काळात मला देखील जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मोक्का लावण्याचा देखील प्रकार झाल्याचा श्री. प्रधान यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT