file photo 
नांदेड

नांदेड : संचारबंदीच्या नियमाचे कठोरपणे पालन करा- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

प्रल्हाद कांबळे

नांदेड :- जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व पातळीवर प्रयत्नांची शर्त केली जात असून जनतेनेही तेवढ्याच जबाबदारीने जिल्हा जाहीर केलेल्या संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. हा लढा सर्वांच्या मुक्तीचा असून सर्वांनी एकत्रीत आपले कर्तव्य व काळजी घेतली तर जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाला आपण यशस्वीपणे नियंत्रणात आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

संचारबंदी कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज राहणार बंद

नांदेड : कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ता. 25 मार्च ते ता. 4 एप्रिल या कालावधीत नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील तसेच शिबिर (कॅम्प) कार्यालयातील सर्व कामकाज संचारबंदी कालावधी बंद राहणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड : नांदेड जिल्ह्यात ता. 25 मार्च रोजी सकाळी सहा वाजेपासून ते ता. आठ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार (ता. 25) मार्च रोजी सकाळी सहा वाजेपासून ते ता. आठ एप्रिल रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलिस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलिस अधिकारी यांना राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT