Wrestler Balu Bodke Win
Wrestler Balu Bodke Win sakal
नांदेड

नांदेड : मल्ल बाळू बोडकेने दाखविले संतोषला अस्मान

सकाळ वृत्तसेवा

कंधार : महादेवाची बोरी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या बोरी बुद्रुक (ता.कंधार) येथील महादेवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत शेवटची कुस्ती बाळू बोडके व संतोष जगताप या मल्लात झाली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या कुस्तीत मल्ल बाळू बोडके याने संतोष जगतापला अस्मान दाखवून ५१ हजाराच्या बक्षिसाबरोबर चांदीची गदा पटकावली. प्रकाश झोतात खेळलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महादेवाची यात्रा पार पडली. धार्मिक, सांस्कृतिक आदी कार्यक्रमाचे आयोजन यात्रेनिमित्त करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.१५) दिवस-रात्र प्रकाशझोत कुस्त्यांच्या दंगली झाल्या. या दंगलीत राज्यातील प्रसिद्ध मल्ल सहभागी झाले होते. कुस्तीची दंगल प्रसिद्ध मल्ल गोविंद तात्या पवार, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, सरपंच बालाजी जुंबाड, देवानंद सांगवे, राम देवकांबळे, डॉ. संजय केंद्रे, माधव मुसळे, विठ्ठल मुंडे आदींच्या उपस्थितीत झाली.

कै. रामु मुंडकर पैलवान आखाड्यात अंतिम कुस्ती संतोष जगताप व बाळू बोडके यांच्यात उत्कंठावर्धक झाली. मल्ल बाळु बोडके याने धोबीपछाड दाखवत संतोषला चितपट केले. त्याला कै. नारायण तेंलगे यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलेली चांदीची गदा देण्यात आली.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती वैभव माने विरूद्ध सोन्या सोनटक्के यांच्यात झाली. त्यात वैभव माने याने बाजी मारत ३१ हजार रोख रक्कमेचे बक्षिस पटकावले. तिसरा क्रमांकासाठी सचिन पाटील व गणेश तांबे यांच्यात भिडत झाली. यात सचिन पाटीलने तिसरा क्रमांक पटकावला. डॉ. गंगाधर तोगरे, पंडित केंद्रे, माधव केंद्रे, दिगंबर कावलगावे, निवृत्ती व्यवहारे, देविदास गिते, संभाजी व्यवहारे, जयवंत फड, शंकर डुकरे, गंगाधर चांडोळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT