file photo 
नांदेड

बालिकेच्या विनयभंगप्रकरणी एकास सहा वर्षाची शिक्षा- मुखेड न्यायालयाचा निकाल

प्रल्हाद कांबळे

नांदेड : एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला मुखेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश नितीन त्रिभुवन यांनी सहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची बुधवारी (ता. २४) शिक्षा ठोठावली. 

मुखेड तालुक्यातील एका गावात सुभाष चव्हाण (वय २७) हा  एका अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. रस्त्याने जात असताना मुलीला इशारे करणे, अश्लील भाषेत बोलणे, वाईट उद्देशाने पाठलाग करणे असा प्रकार सुरु होता. होणाऱ्या त्रासाबाबत पिडीत मुलीने आपल्या आईला सांगितले होते. त्यानंतर तिच्या आईने आरोपीची समजूत काढली होती. परंतु त्यानंतरही त्रास देणे सुरुच ठेवला. अखेर या प्रकरणात ता. 11 जून 2016 रोजी मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यामध्ये विनयभंग आणि पोक्सोचा कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. उपलब्ध साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी सुभाष चव्हाण याला सहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. महेश कागणे यांनी बाजू मांडली. दंडाच्या दहा हजार रुपये रकमेतील पाच हजार रुपये पीडित बालिकेला देण्याचे आदेश दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT