Prashant Bamb malpractice in construction department of Nanded Ashok Chavan cheated by officials
Prashant Bamb malpractice in construction department of Nanded Ashok Chavan cheated by officials sakal
नांदेड

नांदेडच्या बांधकाम विभागात मोठा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक कामांत गैरव्यवहार होत आहे. तीन वर्षांपूर्वी बोगस डांबर चलनाद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही केवळ कंपनीचे नाव बदलून त्याच व्यक्तींना कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. अशा कामांद्वारे या विभागातील अधिकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला.

कथित डांबर गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) जबाब नोंदवण्यासाठी बंब सोमवारी येथे आले होते. त्यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर गैरव्यवहार प्रकरणी सततच्या तक्रारींमुळे संबंधित कंपनीच्या काही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर संबंधितांकडून काम काढून घेण्यात आले. मात्र, एका रात्रीत दुसरी कंपनी स्थापन करून जी. जी. कन्स्ट्रक्शनची गार्गी अॅन्ड गार्गी या नावाने कंपनी स्थापन करून पूर्वीच्या कंपनीतील सर्व कार्यकारिणी या कंपनीत घेण्यात आली. त्यांनाच पूर्वी ३२ कोटींना दिलेले टेंडर आठ दिवसांनी ३८ कोटींना देण्यात आले. ही बाब उघड झाल्यावर तक्रार केली होती.या प्रकरणाची एसीबी, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही, पुरावे देऊनही तीन वर्षापासून चौकशीही करण्यात आली नाही.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातच बांधकाम विभागात गैरव्यवहार होत आहे. चव्हाण यांनी मतदारसंघातील एखादा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे केल्याचे दाखवले तर मी आमदारकी सोडेन.

- प्रशांत बंब, आमदार

आमदार बंब यांच्या तक्रारींची चौकशी झाल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी विधिमंडळ अधिवेशनात सांगितले होते. तरीही बंब हे जाणीवपूर्वक चौकशी होत नसल्याचे रडगाणे गात आहेत.महाविकास आघाडी व पालकमंत्र्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- अमर राजूरकर, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT