nanded
nanded sakal
नांदेड

Nanded News : शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न सोडविणार ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

हदगाव : तालुक्यात विमा लाभ वितरीत करताना कोणते निकष लावले. मोजक्याच शेतकऱ्यांना जसा लाभ दिला तसा सर्वांना द्या, नाही तर कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केला जाईल. असा इशारा ता.३० जानेवारी रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देत त्यांना धारेवर धरले.

हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून विमा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी मुंबईत आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (ता.३०) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

यावेळी हदगाव तालुक्यात ८० हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला तर ४० हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. ज्या मोजक्या शेतकऱ्यांना तुम्ही विमा मंजूर केला त्याच निकषानुसार इतरांनाही विमा द्यावा अन्यथा मी कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करील अशी ताकीद मुंडे यांनी यावेळी बोलताना दिली.

मुंबईत पार पडलेल्या बैठकीस मंत्री संदिपान भुमरे खासदार हेमंत पाटील बाबुराव कदम कोहळीकर, शेतकरी नेते आत्माराम पाटील वाटेगावकर, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, विभागीय कृषी आयुक्त आवटे, जिल्हा कृषी अधिकारी बराटे, गजानन शिंदे धानोरकर, शिवाजीराव जाधव हरडफकर, संदीप पालकर, नागोराव सूर्यवंशी, अविनाश पाटील, रवीकुमार सूर्यवंशी, राजू पाटील या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास मंत्रालय मुंबई येथे पाचारण करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT